सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ रविकिरणही मोहात पडले
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
चुलीवरच्या खमंग भाकरीचा
खमंग वास हवेत पसरता
रविकिरणही मोहात पडले
जाळीदार झरोक्यातुन येते झाले
☆
उजळून टाकले तयांनी
कष्ट करणारे दोन्ही हात
सोन्यासम झळकु लागली
भाकरीपिठासह तीची परात
☆
चुल आपल अग्निहोत्र
शांतपणे चालुच ठेवते
अन्नपूर्णा समोर बसुन
आयुष्य सरकवत रहाते
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈