श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ अंधार असा घनभारी… कवी ग्रेस ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२)
अंधार असा घनभारी
चंद्रातून चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले.
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरून
क्षितीज जसे धरणीला
श्वासांनी धरले उचलुन…
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती?
जणु ह्रदयामागून माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे…
– माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈