वाचताना वेचलेले
🍃 “पानं…” 🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆
काही पानं भरवायची असतात – (वही)
काही पानं वाढायची असतात – (जेवण)
काही पानं रंगवायची असतात – (खायची पानं)
काही पानं जाळायची असतात – (पालापाचोळा)
काही पानं जपायची असतात – (पिंपळ)
काही पानं कुटायची असतात – (पुदिना)
काही पानं लुटायची असतात – (आपटा)
काही पानं खुडायची असतात… (चहाची पानं)..
काही पानं तोरणात सजवायची असतात… (आंब्याची )
काही पानं केसात घालायची असतात… (केवड्याची )
काही पानं जोडायची असतात – (पुरवणी)
काही पानं लपवायची असतात – (प्रगती पुस्तक)
काही पान दुमडायची असतात, तर काही नवीन उघडायची असतात. – (पानं सुख- दुःखाच्या क्षणांची)
संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈