सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ परिधि… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆
सुश्री मीरा जैन
यवेळी गगनने आपली मैत्रिण श्रुती हिच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ठरवला. व्हॉट्स् अॅ पवर त्याने श्रुतीला मेसेज केला, `तुझी इच्छा असेल, तर आपण आज लाँग ड्रईव्हला जाऊ.’
श्रुतीने सहर्ष मान्यता दिली. थोड्याच वेळात दोघे लाँग ड्रईव्हवर निघाले. झाडा-झुडपांमधून गेलेला शांत, निवांत रस्ता, रस्त्यावरून सरपटणारी लक्झरी कार, रोमँटिक गाणी, मनातही रोमान्स चरम सीमेवर… अशात श्रुती अचानक म्हणाली, `गगन चल, परत जाऊ या.’
आश्चर्याने गगनने विचारले, `का ग? अद्याप आपण अर्धा प्रवाससुद्धा केलेला नाही.’
श्रुती हळुवारपणे म्हणाली, `मला वाटत नाही, हा प्रवास पूर्ण व्हावा.’
तिच्या कानात आईचं बोलणं गुंजत होतं. जेव्हा ती नटून-थटून घरातून बाहेर पडताना आईला म्हणाली होती, `आई मी जातेय.’ तेव्हा आईने तिला हे विचारलं नाही की कुठे चाललीयस? तिचे एकंदर हाव-भाव बघून एवढंच म्हणाली, `इतकीही दूर जाऊ नकोस की जिथून परतणं मुश्कील होईल.’
मूळ हिन्दी कथा – परिधि – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈