☆ शब्दांचे गाठोडे… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
☆
शब्दांचे गाठोडे, घेऊन फिरतो
शिदोरी ठरतो, शब्द माझा
*
शब्दांनी बांधतो, शब्दांनी सांधतो
आधार ठरतो, शब्द माझा
*
शब्द व्यवहारी, नित्य देतो घेतो
तारण ठरतो, शब्द माझा
*
शब्द भांडताना, सीमा ओलांडतो
बोचरा ठरतो, शब्द माझा
*
तरी काळजीने, शब्दांना मांडतो
ठसका ठरतो, शब्द माझा
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈