प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ पहिला थेंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
वरुण आला झुला झुलवीत
मेघडंबरीत वरात काढीत
नभ फाकीले सौदामिनीने
धरतीलाही तृप्त फुलवित
*
पहिल्या थेंबात पृथा लाजली
मृदुगंधाचे अत्तर सोडीत
आस वाढली दोन्ही जीवांना
बिलगत आले घट्ट मिठीत
*
धरा भिजली पानोपानी
वरुण आला इंद्रधनू रेखीत
कणाकणात मने भिजली
दान टाकले धरेच्या ओटीत
*
ओटी भिजली मोती बीजात
गर्भात सजले बीज अंकुरित
हिरवाई पसरली अंगोपांगी
आंनद झाला साऱ्या सृष्टीत
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



