श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ कलियुगाशी… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
सा-या युगाची साक्ष
पंचभूतांचे रक्ष
जीवनिर्जीव दक्ष
देवप्रमाण.
*
अहं प्रवृत्ती दुष्ट
आयु जीवन नष्ट
असूर तेची स्पष्ट
दैत्यसमान.
*
सत्य वर्तनी राम
एक वचनी धाम
एक पत्नीत नाम
पुरुषोत्तम.
*
विश्व लिलेचे चित्र
ज्ञान शिक्षेचे छत्र
सत्ता प्रजेचे सत्र
श्रीकृष्णरुप.
*
हेची आदर्श देशा
तेची मानवा शेषा
पुण्य संचित आशा
कलियुगाशी.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



