सौ कुंदा कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ जीवन स्वामी समर्पण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
☆
ऐशी च्या उंबरठ्यावर केले पदार्पण
अवघे जीवन स्वामी अर्पण
दुःख वेदना पीडा तर्पण
अवघे जीवन स्वामी समर्पण (1)
*
तब्येतीची सदैव कुरकूर
मनी वाटते उगीच हुरहूर
पैलतीराकडे नजर दूरवर
नयनी लोटे अश्रूंचा पुर
(2)
*
सगे सोयरे मित्र मैत्रिणी
सुखद क्षण खेचून आणी
मग कसली आणीबाणी
राम नामे रतली वाणी (3)
*
शेवटचा दिस गोड व्हावा
स्वामी वरदहस्त नित लाभावा
निरामय आरोग्य लाभ असावा
सदैव कार्यरत, नको विसावा (४)
☆
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




