मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१४ ☆ वटवृक्ष… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१४ ?

☆ वटवृक्ष ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

वडील गेल्यानंतर… 

थोड्याच दिवसात गावातला,

 खूप पुरातन वटवृक्ष कोसळला…

पावसाळ्यात!

त्या वटवृक्षावरची असंख्य पाखरं ,

कुठं गेली असतील?

त्यांनी  कुठे बांधली असतील

नवी घरटी ?

त्या मुसळधार पावसात!

 

झाड कोसळलं की,

पक्षी होतात बेघर…आणि माणसं,

हरवतात त्यांचा पावसा पाण्यातला,

निवारा आणि उन्हातली सावली !

 

 लहानपणी आजी सांगायची गोष्ट,

साळीतली साळूबाई,

निंबाखालचा निंबोजी,

अंब्या खालचा अंबोजी….

पूर्ण गोष्ट आठवत नाही,

पण साळीच्या शेतात,

निंबाच्या झाडाखाली,

अंब्याच्या झाडाखाली…..

मुलं सापडायची की जन्मायची?

हे कळत नव्हतं तेव्हा…बालबुद्धीला,

 आयुष्याच्या संध्याकाळी

जाणवतंय—

जुनी झाडं पडली ,

तरी उगवतात नवी झाडं,

आपसूकच!

झाडं बापच असतात आपले!

म्हणूनच बापावरही सांगू नयेत अधिकार!

दोघांना सोसावेच लागतात,

बहर….फुलाफळांचे…आणि पानगळीचे शापही !

आयुष्यात एक तरी झाड लावावं!

बापाची आठवण म्हणून…..

आणि

पुढच्या अनंत पिढ्यांसाठी बनून रहावं…..

 

बापझाड!

 

आधार वड !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

नि:संग हो मना

करूनी साधना।।

 

संग तो विषयांचा

संग तो अशाश्वताचा

शाश्ववताचा लळा

लाव रे मना…

नि:संग…

 

सांडी रे मोह-माया

नश्वर देह ही काया

नाम जप जपाया

गोडी लावी ये मना..

नि:संग…

 

हे चपल मना

जरा शांत बस ना

मर्कट लिला थांबवं ना

तुज मुळे फे-यात अडकेल ना..

नि:संग…

 

बघ ना मना

तुझिया नामातच

सार आहे कलीयुगेचे

उद्धरण्या जना..

नि:संग…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२७ ☆ घरात वादळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२७ ?

☆ घरात वादळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नाही अंगण नाही कर्दळ

हद्दपार ही झाली बाभळ

*

जुन्या घराचे झाले टॉवर

कॉलनीतही नाही वर्दळ

*

वारा इथला शांत भासतो

प्रत्येकाच्या घरात वादळ

*

शहरासाठी गाव सोडले

प्रदूषणाने येते भोवळ

*

डोळ्यांमधले हट्टी अश्रू

पुसले त्याने सारे काजळ

*

पक्षी सारे उडून गेले

पहा ओस ही झाली ढाबळ

*

डोंगर माथी वर्षा होता

दऱ्या दऱ्यातुन निघती ओघळ

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे बंध… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ हे बंध ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

हे बंध नात्यांचे तुटताना ,

उगा गहिवर दाटून येतो .

काळजाला बांधल्या गाठीचा

सल मनात खुपत रहातो

*

वेळेस कधी सावरताना

मी काळास साकडे घालते

या निराधार आभाळाचा

टाहो  उरातच फोडते

*

हे बंध मायाजाल होताना

ओझे सरताना न सरते

ही आठवे पुसून टाकताना

मात्र गोंदण मातीत उरते

*

लाट किनार्‍याहून परतताना

फक्त वाळूच किनारी उरते

वाळूस मुठीत आवळताना

ती हळूवार निसटून जाते 

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वैशाख दृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वैशाख दृश्य... ☆ श्रीशैल चौगुले ☆

वा-यात थोडी माया झाड वेली छाया

धरती सुख काया धग दाह वाया.

*

असूर उष्मा नाचे जीव स्पर्शा टोचे

वणवा तुरा खोचे घाम-घाम साचे.

*

घनाचा कृष्ण वर्ण रानो माळी श्रम

आर्याचा तोरा क्रम अहं श्रेष्ठी भ्रम.

*

भृंगर नाद धरी फुलां फुलां वरी

वैशाखी मजा खरी तप्त धरा जरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्राण डोळ्यात साठले… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्राण डोळ्यात साठले... ? श्री आशिष  बिवलकर ☆

दूरदेशी भरकटलेल्या पाखरा,

घरट्याला तुझे आस आहे |

मंजूळ किलबिलाट तुझा,

आवती भोवती भास आहे |

*

इथेच जन्माला अन् बागडला,

न कळत हळू हळू वाढलास |

बळवताच रे दोन पंख तुझे,

भुर्रकन दूर कसा उडून गेलास |

*

जुने घरटे आज झाले सुने सुने,

त्यात थकलेले दोन जीव आहे |

कृतघ्न तुला नाही तीळमात्र रे,

पण वृक्षाला त्यांची कीव आहे |

*

त्यांनीच काडी काडी वेचून इथे,

साकारलेलं हेच ते घरटे आहे |

वार्धक्याच्या हेलकाव्यावर,

दोघे असहाय्य एकटे आहे |

*

फिरक ना रे पाखरा घरट्याकडे,

अंधुक स्मृतीने तुला आठवू लागले आहेत |

डोळे मिटण्याआधी तुला पाहण्यासाठी,

प्राण डोळ्यात साठवू लागले आहेत |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही स्मरुन गेले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ काही स्मरुन गेले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कांही स्मरुन गेले

कांही विसरुन गेले.

भरुन मेघ आले

ओसरुन तेही गेले.

शिलकीचे कांही पाणी

साचून ओघळ झाले.

पुलाखालून एरवी उरले

सर्वस्व वाहून गेले.

शैशवात सोडली जी

सैरभैर झाली नावं.

हरवून आता गेले

स्मरणातले रम्य गाव.

नकोस साकव बांधू

ऐलपैल सांधणारा.

संयमित समजुतीचा

सांभाळीन मी किनारा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक सकाळ… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक सकाळ… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

एक सुंदर सकाळ अशी वेगवेगळ्या

पक्ष्यांच्या निनादाने भरलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी गारठ्याची

शाल तिने पांघरलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी झाडांच्या

डोलण्याने जणू हसलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी हसत हसत

मुलांना शाळेत घेऊन निघालेली,

 

एक सुंदर सकाळ अशी अप्रतिम

क्षणांचा प्रत्यय देणारी,

त्यांची आणि आपली भेट घडवून आणणारी.

 

एक सुंदर सकाळ अशी…

© अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रहाट… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रहाट… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(“रहाट” प्रामुख्याने ग्रामीण जीवन, श्रम, आणि निसर्गाशी असलेलं नातं दर्शवते. “रहाट” म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरलं जाणारं पारंपरिक साधन)

रहाट फिरतो अखंड

घेऊन श्रमांचा छंद

पाण्याच्या प्रत्येक थेंबात

दडले कष्टांचे गंध

 

विहिरीच्या काठावरती

जीवन गाते गाणं

रहाटाच्या तालावरती

चालते जगणं

 

दिवस-रात्र न थांबता

फिरत राहतो तो

शेतकऱ्याच्या आशांना

पाणी देतो तो

 

कष्टांची ही गाथा

निसर्गाशी नातं

रहाट सांगतो आपुलं

जगण्याचं सत्य

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लावण्यखणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ लावण्यखणी सुश्री नीलांबरी शिर्के 

कर्णभुषणे

किती देखणी

झाडच वाटे

लावण्यखणी

*

सजते सौंदर्य

याहून दुसरे

पाहिले का

असेल कोणी!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares