मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मराठीची ऐशी की तैशी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मराठीची ऐशी की तैशी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(काल बेला शेंडे हिच्या लाईव्ह शो ने लोकसत्ताच्या “अभिजात लिट फेस्टची” सांगता गडकरीला झाली. पण तिकीट बारी वरील पाटी बघून (फोटो बघा) डोकं भणाणून गेलं! तेंव्हा कार्यक्रम बघतांना लिहिलेली रचना!)

*

मराठी लिट फेस्टमध्ये 

भाषेची पडली बत्तीशी,

जीव सोडला मराठीने 

ठाण्यात कालच्या दिवशी!

*

प्रयोग ‘नवीन नाटकाचा’

होता काल हाउसफुल्ल,

बोर्ड बघून गडकरीचा 

दांडी मराठीची झाली गुल!

*

‘बेला’चं नवीन नाटक 

तिला सुद्धा माहित नसावं,

बोर्ड बघून वाटलं लोकांना 

आता हसावं कां रडावं!

*

खरी ‘अभिजात मराठी’

लोकसत्तालाच कळली,

डोळ्यात भरण्या सारखी 

*फेस्टची सांगता झाली! *

*फेस्टची सांगता झाली! *

टीप: व्यक्त केल्या गेलेल्या विचारांशी / मतांशी संपादक-मंडळ सहमत असेलच असे नाही..

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०४ ☆ समता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०४ ?

☆ समता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(एक मुक्तछंद कविता)

भारतीय आहोत सारे धर्म असो वेगळे,

सर्व धर्म समभाव येथे, एक आपली पाळेमुळे !

*

रमजान,नाताळ अन् दिवाळी, सण करु साजरे ,

 आहेत एकमेकांवरी आपले प्रेमभाव निर्व्याज रे!

*

भारत आपला देश आहे वेगळा अन् चांगला,

राम, रहीम, रॉबीन येथे नेहमी मैत्रभावे वागला!

*

प्रेम नांदो या इथे, जाती ,धर्म या भिंती नको

एकता, समता, समभाव येथे ईश्वर राखो !

*

शांती असावी सर्वदा, आपण मानवता मानतो,

प्रेमभावाचाच आपला इतिहास येथे गाजतो

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला वसंत सोहळा… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ आला वसंत सोहळा ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

आला वसंत सोहळा

देठ पानास कोवळा

सोनपालवी आडानं

गोड गाते ती कोकिळा

 *

नाविण्याचा हा आनंद

धरा सजण्यात धुंद

मंदावलेला समिर

जाये लुटूनिया गंध

                *              

रंग हिरवा पानात

भाव कोवळा मनात

रानी फुलतो बहावा 

गंधाळूनी आसमंत

 *

रास पिकल्या पानाची

वारा नेतोया  लूटून

जुनाट त्या आठवांची

कर मना बोळवण

 *

सरं आता पानगळ 

उन चौफेर पिवळं 

कुहूकुहू ताल धरी 

किती सुरेल ते बोल

 *

रानीवनी पळसाला

रंग केशरी चढला

किलबिल पाखरानी

सोनआनंद वाटला

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१९ ☆ षड्रिपूंची होळी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१९ ?

षड्रिपूंची होळी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

लाकडाची वाटतो हा देह मोळी

जाळणारच षड्रिपूंची आज होळी

 *

अर्पिला नैवेद्य मी होळीस आणिक

माय माझी वाढते बघ तूप पोळी

 *

डोस थोडा वाढवावा लागणारच

टाळता ही येत नाही रोज गोळी

 *

राख फासत एकमेकाला उद्याला

गावभर फिरणार आहे मस्त टोळी

 *

रंग होता लावण्याचा बेत माझा

अन् तिने तर घातलेली शुभ्र चोळी

 *

हो तिलाही शौक आहे रंगण्याचा

शोधते संधी अशी ती नार भोळी

 *

रंग इतका फेक माझ्यावर सख्या तू

त्याच रंगाने भरावी पूर्ण झोळी

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृती सावली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ स्मृती सावली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मनातल्या ईच्छांना स्पर्श वेदनेचा

वियोगात स्मृतींना शाप साधनेचा.

*

भाव होऊनी एकजूट स्पंदनात

गतजन्मीच्या त्याच खुणा स्फुंदणेचा.

*

सांगत मी जावे पुन्हा, साक्ष प्रांगणेचा

सुंदर जीवन की संसार झिंगणेचा.

*

सावली घेऊनी आयुष्य क्षितीज पार

रंग भिन्न हेतूत चित्र पांगणेचा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माझी मायबोली… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? माझी मायबोली… ? श्री आशिष  बिवलकर ☆

(१) 

मराठी प्रसवे | माझी मायबोली |

ज्ञानियांची वाली | राजभाषा ||१||

*
मराठी धरते | ज्ञानाची सावली |

भाषांची माऊली | जगी श्रेष्ठ ||२||

*
मराठी दाखवी | जगाची खिडकी |

सर्वांची लाडकी | मातृभाषा ||३||

*
मराठी गिरवी | हाती बाराखडी |

मुळाक्षर कडी | ज्ञानासाठी ||४||

*

मराठी शिकवी | संतांचे वचन |

ज्ञानाचे लोचन | अध्यात्माने ||५||

*

मराठी पाजते | मुखी बाळकडू |

पराक्रम घडू | कर्तूत्वाने ||६||

*

मराठी फोडते | मदांध ते तख्त |

क्षात्रधर्म व्यक्त | सामार्थ्यांने ||७||

*

(२) 

जन्माला आल्यावर,

बोबडे बोल आले ओठी |

श्वासाश्वासात जगतो,

माझी भाषा माय मराठी |

*
अमृताहुनही गोड,

जीची महती वर्णावी जगजेठी | 

ज्ञानाचा महासागर,

सामावते माझी माय मराठी |

*

शब्दातून व्यक्त होण्यासाठी,

जन्मोजन्मी जिव्हेशी जोडल्या गाठी |

कशाचीही तमा न बाळगता,

व्यक्त होताना बोलतो मराठी |

*

संतांनी आयुष्य खर्चले,

समाजाच्या उध्दारासाठी |

साध्या सोप्या शब्दात,

लिहल्या ओवी मराठी |

*

नाठाळांच्या माथी हाणायाला,

वापरतो शब्दरुपी काठी |

संताप व्यक्त करतांना,

शिव्यांची लाखोली वाहतो मराठी |

*

कविता लिहिण्याचा छंद जडला,

मी असेल नसेल.. त्याच स्मरतील पाठी |

माझ्या शब्दांवर प्रेम करणारे,

काव्य रसिक असतील मराठी |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जि  व  ल  ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏जि  व  ल  ग ! 🙏☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आता थांबवीन म्हणतो

जरा शब्दांशी खेळणे,

त्यांनी तरी किती नाचावे

सदा माझ्या मनाप्रमाणे!

*

कशी कोण जाणे याची

लागली शब्दांना कुणकुण,

रागावून सोडले त्यांनी

माझ्या डोक्यातील ठाणं!

*

गेले असेच दोन दिवस

सरल्या दोन रात्री,

तेपरतणे शक्य नाही

मज याची झाली खात्री!

*

पण आज पडली अवचित

थाप डोक्याच्या दारावर,

उघडून पाहता दिसले

माझेच मला जुने मैतर!

*

गळा भेट होता आमची

दोघे मनोमनी सुखावलो,

नाही सोडणार साथ कधी

एकमेका वचन देते झालो!

एकमेका वचन देते झालो!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वात्सल्याचा गाव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वात्सल्याचा गाव ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

(१)

घरी परतता संध्याकाळी

कोणी तरूणी लेकुरवाळी

मना पिलाची ओढ लागते

तटतटते अंगी काचोळी!!

*

पिलू भुकेले नजरेपुढती

पाय आपसूक वेगाने पडती

पिलू पाहता वक्षामधूनी

अमृत धारा बरसत जाती!!

*

  कवयित्री : नीलांबरी शिर्के

 

(२) 

गायीच्या न् आईच्या नेत्री

वात्सल्याचा वसतो गाव

बुडी मारूनी तिथे खोलवर

घ्यावा म्हणते त्याचा ठाव!!

*

नाक दाबुनी डोळे मिटले

आणि तळाशी गेले थेट

सदाचार अन संस्कृतीचे

ममताभरले काळीज बेट!!

*

त्या गावातुन फिरता जाणवे

निरामय विचारसहवास

पावन हळवी लहर भरवी

आपुलकीने विचार घास!!

*

तृप्तपणे माघारी फिरताना

मातृत्व वात्सल्य मिळे वसा

वसा घेऊन परतताना  

भरला जाई काळीज कसा!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८३ – दोषी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८३ – विजय साहित्य ?

☆ दोषी…!

(मात्रा वृत्त – २५ मात्रा)

माझ्याआधी, मलाच गेले, वाचून कोणी

उपदेशाचे, डोस पाजले, हासून कोणी. १

*

चेष्टा, टिंगल, आणी टवाळी, झाली कविता

आदर देता, सादर झाले, आतून कोणी.२

*

घनिष्ठ झालो, बघता बघता, ‌या मनी नांदलो

काळजास त्या, दिली उभारी, राहून कोणी. ३

*

हळवेली पण, मधाळ बोली, संजीवन ते

श्वास फुलांचे, अत्तर गेले, माखून कोणी.४

*

नको‌ तेवढे, वाटत गेलो, धन शब्दांचे

अक्षर काळे, भास्कर झाले, लाजून कोणी.५

*

जपली नाती, वेळ देऊनी हिशेब नाही

नाते गेले, मनासारखे, वागून कोणी.६

*

मतभेदाचे, आले वारे, कडकड नाही

घरात गेले, वहात तेव्हा, पाहून कोणी.७

*

हाकेसरशी, दमात एका, आधार झालो

विश्वासाला, हलाल केले, मागून कोणी.८

*

घर शेणाचे, घर मेणाचे, जमले नाते

अनुभवांचे, दार घेतले, लावून कोणी.९

*

हात लिहिते, थांबले कधीचे कळले नाही

विडा निरोपी, हातावरचा, चाखून कोणी.१०

*

लळा‌ लावूनी, गळा कापला, कविराजाचा

स्वभाव‌ ठरला, दोषीच तेव्हा, टाळून कोणी.११

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फटका…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ फटका ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

!! श्री!!

(उपक्रम – हरिभगिनी वृत्त – फटका)

 (मात्रा ८|८|८|६)

मना जाण रे मनोबोध तू समर्थ शिकवण जाणावी

मना चांगले वाग नेटके विवेक संगत राखावी ||

*

नको हाव रे धनद्रव्याची गरजेपुरते जोडावे

समाधान हे मनात असते व्यर्थ धावणे सोडावे ||

*

अती क्रोध अन अती मस्करी हानीकारक बघ ठरते

नियम बंधने तोडता मना संसाराचे सुख सरते ||

*

व्यसने घातक रोग शरीरा त्यांची संगत धरू नको

देह संपदा मूल्यवान ती हेळसांड तू करू नको ||

*

झाले गेले विसरुन सारे जिवलगांसवे बंध हवे

आयुष्याचे रूप देखणे बनत जातसे नवे नवे ||

*

मृदू बोलणे नित्य असावे कथन करावे प्रेमाने

माणसातल्या देवत्वाला वंदन करणे विनयाने ||

*

मायपित्यांची सेवा करणे कर्तव्याला चुकू नको

पाठीराखा देव होतसे नामस्मरणा टाळु नको ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares