मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गाची रंगपंचमी ☆ शुभदा भा. कुलकर्णी ☆

शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? निसर्गाची रंगपंचमी ?  शुभदा भा. कुलकर्णी ☆

बाई माझ्या अंगणात 

रंगे पंचमीचा खेळ 

रंगात रंगुनी साऱ्या 

निसर्गही बहरात..

*
कोवळी ही हिरवाई 

पानांपानांत हसली 

कळी -फुलां बिलगुनी 

आनंदाने गाणे गाई..

*
सप्तरंगात न्हाली 

फुले मोहक सुंदर 

वाऱ्यासवे झोके घेता 

नकळत शहारली..

*
वसंताच्या सोहळ्याला 

येई रंगत आगळी 

हर्ष भरे मन माझे 

देई साद कवितेला..

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०९ ☆ अभिसारिका… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०९ ?

☆ अभिसारिका… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सत्य तू, स्वप्न तू तुझाच फक्त ध्यास…तू पण ना

राहसी नेहमी इथेच आसपास…तू पण ना

*

वाटते लोकलाज, एकटीच सैरभैर पहा

दूर तू बंधमुक्त,का मलाच त्रास…तू पण ना

*

कोण तू ? कोण मी? अनाम भावबंध हा कसला?

मोगरा शुभ्र सा तसाच तूच खास…तू पण ना

*

राहते एकटी तुझ्या शिवाय मी इथे सखया

कोणते प्रश्न? कोणते उगा कयास…तू पण ना

*

स्थान दे काळजात , कोणते नकोच अर्थ घरा

विरह साहून ,सोस हा तुझा मनास…तू पण ना

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मरणामधले जगणे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ मरणामधले जगणे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

(अनलज्वाला – ८/८/८)

अश्वत्थामा रोज स्वतःला जाळत असतो

चिरंजीव तो कणाकणाने वाळत असतो

 *

माणुसकीचे श्राद्ध घातले असा कसा तो

सोबतीस मग कुत्र्यांना का पाळत असतो

 *

वेळ बांधुनी एका जागी रहात नसते

निघून गेली म्हणून अश्रू ढाळत असतो

 *

हिरा सोडुनी तप्त कोळसा हाती घेतो

कृद्ध मनाला जाळत का सांभाळत असतो

 *

अमर समजुनी स्वप्न उद्याचे पहात असतो

मरणामधले जगणे पण धुंडाळत असतो

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२३ ☆ ओठावरील मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२३ ?

☆ ओठावरील मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संशय ऋतूस अपुला आला असेल का?

संयम समीप येता ढळला असेल का?

*

डोळ्यात भावनांचा संग्राम पेटला

भात्यात बाण होता सुटला असेल का?

*

तारा नभातुनी हा वेडा खुणावतो

त्याचा तिला इशारा कळला असेल का?

*

ओठावरील मोती नथनी मधील तो

स्पर्शात जीव त्याच्या जडला असेल का?

*

गालात लाजणारा तो चंद्र कालचा

प्रणयात आज पुरता रमला असेल का?

*

तू रंग फेकला मी डागाळले जरा

तो डाग काळजावर ठसला असेल का?

*

ओढून गंध नेतो झाडाकडे मला

मज पाहताच चाफा फुलला असेल का?

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्रातला पाऊस… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चैत्रातला पाऊस... ☆ श्रीशैल चौगुले ☆

चैत्रपालवीत पाऊस थेंबा

धगधग निववून अचंबा

शुभ्र आभाळी अशी अवकाळी

धरतीस आस ओलीत बिंबा.

ऋतू वसंती बहार भिजवा

मन सुखावून झेलती धारा

ऊष्मेचा दाह फोडून घनात

टप-टप पाऊस मातीचा तोरा.

 *

तशात कोकीळ स्वरात गोडी

पक्षी आनंदी वल्लरीची जोडी

हृदय ओथंबून स्मृती भरा

निवडुंगी चेहरा खुले कुढी.

 *

वारा वावटळीचा कावंदूळ

घरघर ढग, चमचम विजा

क्षणात गारा, खळखळते पाणी

हसला निसर्ग गाली खळी साजा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मातृत्वाची दैवी शक्ती! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मातृत्वाची दैवीशक्ती! ? श्री आशिष  बिवलकर ☆

व्याघ्र मुखी तिचा जीव,

निश्चिंत नेत्र पाडसं सुखरूप |

तिन्ही जगी श्रेष्ठच माता,

त्याग समर्पणाचे वंदावे रूप |

*

आई ती आई असते,

जीव तिचा सदा लेकरात |

अखेरच्या श्वासापर्यंत,

तेवत ठेवते जीवनाची वात |

*

लेकेराला जन्म देण्यापासून,

वाढेपर्यंत सोसते नाना कळा |

अपार कष्ट हाल अपेष्टा सोसत,

जगते निरपेक्ष मातृत्वाचा सोहळा |

*

लोण्यापेक्षा मऊ असतात,

मातेच्या ह्रदयातले भाव |

ममत्वाचा महासागराच तो,

कुणी न जाणे अंतरंग ठाव |

*

मातृत्वाची दैवीशक्ती सदैव,

तिच्याच अंगात फक्त वसते |

मृत्यू जरी उभा राही समोर,

लेकरांनाच न्याहळत असते |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मोरपिसांचा शिरी मुकुट घे वासुदेव ये दारा

जीवनार्थ सांगे न्यारा ||ध्रु||

*

काळप्रवाहावरी तरंगे आयुष्याचा बुडबुडा

फेस किती जाहला तरीही क्षणभंगुर हा देई धडा ||१||

*

आयुष्याच्या बाजारातुन कृपा विकत घ्या देवाची

भावभक्ती हे मोल तयाचे ना दडवुनी ठेवायाची ||२||

*

देह लाभला आत्म्याला हा कर्म कराया उद्धारा

फलासी ना गांठी राखावे अर्पण करणे मार्ग बरा ||३||

*

आपुल्यासाठी नाही जगणे हाच जीवना अर्थ खरा

जीवन अर्पण सकलांसाठी जगण्याचा परमार्थ धरा ||४||

*

घाम गाळुनी कमविलेस ते इथेच भोगुनिया जावे

पुढे आपुला मार्ग एकला मोह सोडुनिया जावे ||५||

*

आयुष्याचा खडतर मार्ग आपुल्यासाठी जगतांना

काय हरवले काय गवसले हिशेब याचा मांडा ना ||६||

*

कुठून आलो कुठे जायचे नाही कुणाला हे ज्ञात

प्रवास जीवनी असा करू या करून षड्रिपुंचा अंत ||७||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुढारी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पुढारी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

देशात आज माझ्या भंजाळले पुढारी

जनतेस नागवाया सरसावले पुढारी

*

सोडून लाज सारी यांनी कमाल केली

साधू मुळेच नकली भांबावले पुढारी

*

डोळे मिटून आता झालेत आंधळे ते

साधून स्वार्थ घेण्या लाचावले पुढारी

*

दावून खास नखरे केले घबाड गोळा

चवचाल बायकांना नादावले पुढारी

*

संधी बघून यांनी केली धमाल आहे

होऊन बेवडे हे धुंदावले पुढारी

*

आपसात भांडणरे झालेत सांड काही

भिडण्या परस्परांना डरकाळले पुढारी

*

होते गुलाम यांचे शिरजोर जाहलेले

त्यानीच ताकतीने पिरगाळले पुढारी

*

बदनाम होत गेले नाही फिकीर केली

तेव्हा कधी कुठे ते ओशाळले पुढारी

*

फसवायला कुणी तर आला भणंग भोंदू

कावा करून त्याने कवटाळले पुढारी

*

तरबेज भामट्यांनी केली खरी हुशारी

कोंडीत गाठुनी मग निर्दाळले पुढारी

*

आल्या मदालसा ही जबरी नटून आल्या

पदरात छान त्यानी गुंडाळले पुढारी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “येरझारा…” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “येरझारा…” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

हपापलेल्या कावळ्यांनी गजबजलंय रान

अन कावकाव करण्याला सारखंच उधाण…

 

या फांदीवरून त्या फांदीवर.. सतत त्यांच्या येरझारा

झाडाखाली वाढत चाललाय.. नैतिकतेचाच सारा कचरा…

 

पण कावळ्यांना त्याची खंत नाही.. बाकी कसलेच भान नाही

झाड झालंय केविलवाणं.. पण त्यांना बघायला उसंतच नाही…

 

झाडाची पर्वा आम्ही का करायची? ”.. गरजच कुठे आहे या प्रश्नाची

काळजी फक्त टोपी सांभाळण्याची.. फिकीर नाहीच बाकी कशाची…

 

ज्यांना काळजी वाटतेय त्यांना वाटू दे.. राग येतोय तर खुशाल येऊ दे

पण झाड त्यांच्या मालकीचं नाही.. एवढं मात्र अशांच्या लक्षात राहू दे’…

 

आमच्या नावावर आम्ही करून घेतलाय.. कधीच या झाडाचा सातबारा

इतरांना काय करायचंय कसा नि केव्हा.. अशा विचारांना आम्ही देतच नाही थारा’…

 

आम्ही असेच भिरभिरत राहणार.. मनोरे स्वप्नांचे तर रचतच राहणार

गरजेनुसार सहज स्वप्नं बदलणार.. या फांदीवरून त्या फांदीवर…

सतत येरझारा मारतच राहणार..

 सतत येरझारा मारतच राहणार… ‘

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आभा स्वागत… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आभा स्वागत… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

दोन बाजूला चवऱ्या ढाळक 

मधे अंथरला फुलगालिचा 

नभा मधुनी आभा उतरे 

थाट अनोखा तिच्या स्वागताचा ||

*

दोन ढग हे तत्पर असती 

सुगंधी जल शिंपडण्यासाठी 

खग आरव हे हलके नादती 

स्वागत गीत म्हणण्यासाठी ||

*

प्रसन्नतेचे अत्तर सांडले 

वातावरण हे चैतन्यमयी 

रंगसंगती निसर्गाची अशी 

वाटे सकलां मोहमयी ||

*

स्वागताचा हा रम्य सोहळा 

पहाता प्रभात सरते झरझर 

उष्णताही घेउन संगे 

दिनराज मग चढतो वरवर ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares