image_print

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद –भाग २ ☆ सुश्री शुभदा साने

सुश्री शुभदा साने आत्मसंवाद –भाग २ ☆ सुश्री शुभदा साने  ( मागील भगत आपण पहिलं - शब्द – ए, जरा तुझ्या प्रौढ साहित्याबद्दलही बोलू या का? मी - हो.sss बोलूया की....आता इथून पुढे – मी – माझ्या लग्नांनंतरही माझं कथालेखन चालू राहिलं. म्हणजे नेटाने ते चालू ठेवलं. सासरी आल्यावर माझं अनुभव विश्व जास्त समृद्ध झालं, असा मला तरी वाटतं. तसे आपल्या अवती - भवती  बारे-वाईट प्रसंग नेहमीच घडतात. सगळ्यांच्याच मनावर त्या प्रसंगांचा परिणाम होत असतो. पण त्यातला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग  लेखकाच्या मनात आतपर्यंत जाऊन पोचतो. तिथेच तो रुजतो. मग या प्रसंगाच्या आधी काय घडलं असेल? नंतर काय घडेल, हे लेखक त्याच्या कल्पनाशक्तीच्या आधारे ठरवतो. आणि  कथा तयार होते. शब्द - हे पण आम्हाला माहीतच आहे. तू एकदा तुझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमात तू, ‘कथा कशी सुचते’, हे सांगितलं होतस. आम्हीच तर तुझ्या तोंडून बोलत होतो. बरं! तू तुझ्या प्रौढ वङ्मायाबद्दल बोलत होतीस ना!       मी – हो. लग्नांनंतरही मी माझं लेखन नेटाने चालू ठेवलं, पण लेखनासाठी सासरी फारसा वेळ मिळायचा नाही. सारखं कुठलं ना कुठलं तरी काम असेच.  शब्द – ए, पण...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद –भाग १ ☆ सुश्री शुभदा साने

सुश्री शुभदा साने आत्मसंवाद –भाग १ ☆ सुश्री शुभदा साने शब्द – ए ss शुक... शुक... अग शुभदा.... शुभदा साने...जरा इकडे बघ ना!  ऐक तरी आम्ही काय म्हणतोय ते.... मी -  कोण तुम्ही ? आणि असे घोळक्याने का उभे आहात? सांगा ना! शब्द - ओळखलं नाहीस? तुझ्यातच तर असतो आम्ही. तुझ्या मनात.... तू जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतेस, तेव्हा आमचीच तर मदत घेतेस. आम्ही म्हणजे शब्द, मी – खरच की रे, तुम्ही माझे सवंगडी आहात. अगदी बालपणापासूनचे. तुम्हाला शब्दमित्र म्हंटलं तर, चालेल का? शब्द – आता कसं बोललीस? तुला आवडतं आमच्याशी खेळायला. तू लहान होतीस, अगदी तेव्हापासूनच..... आठवतय का? मी  –  आठवतय ना! मी चौथीत किंवा पाचवीत असेन, तेव्हाची गोष्ट.... एके दिवशी संध्याकाळी मला खूप कंटाळा आला होता. त्याचं काय झालं, शाळेतून घरी आले, तेव्हा आई नि दादा दोघेही घरात नव्हते. दादा म्हणजे माझे वडील. शब्द – दादा म्हणजेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ज. जोशी.... मी  – हं ! आगदीबरोबर! तर काय सांगत होते, आई नि दादा दोघेही तेव्हा घरात नव्हते. आणि नेहमी खेळायला येणारी माझी मैत्रीणही तेव्हा बाहेर गेली होती. थोडी हिरमुसून मी...
Read More

हिन्दी साहित्य – ☆ जीवनयात्रा ☆ मेरी सृजन-यात्रा – भाग – 2 ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ (हम स्वयं से संवाद अथवा आत्मसंवाद अक्सर करते हैं किन्तु, ईमानदारी से आत्मसाक्षात्कार अत्यंत कठिन है। प्रस्तुत है सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री भगवान् वैद्य “प्रखर” जी का आत्मसाक्षात्कार दो भागों में।) ☆ जीवनयात्रा ☆ मेरी सृजन-यात्रा  – भाग – 2 ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆ प्रश्न: पहली रचना किस विधा में प्रकाशित हुई? उत्तर:  लेखन आरंभ हो चुका था। यहां-वहां रचनाएं प्रेषित की जाने लगी थीं। इन्हीं में से ‘रचना’ शीर्षक कविता ‘साप्ताहिक हिन्दुस्तान’ के 1 जुलाई 1973 के अंक में प्रकाशित हुई। यही थी प्रथम प्रकाशित रचना। प्रश्न : विभिन्न विधाओं में आपकी एक हजार से अधिक रचनाएं स्थानीय से लेकर राष्ट्रीय-स्तर की पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हो चुकी हैं। यह आपके लिए कैसे संभव हो पाया? क्या संपादकों के साथ व्यक्तिगत संपर्क, वरिष्ठ लेखकों की सिफारिश या किसी और माध्यम से? आपका उत्तर निश्चित ही नये लेखकों के लिए मार्गदर्शक साबित होगा।    उत्तर: यह आपने अच्छा प्रश्न किया है। आपको बता दूं कि मैं रचना-प्रकाशन के संबंध में आजतक किसी भी संपादक से...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 4 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी  आत्मसंवाद   ☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 4 ☆ श्री आनंदहरि  ☆ मी :-  चांगल्या साहित्याचा मानदंड काय आहे किंवा असावा असे तुम्हांला वाटते ? आनंदहरी :-  मला वाटते चांगल्या वगैरे न म्हणता साहित्याचा मानदंड असे म्हणावे. साहित्यिक हा स्वांतसुखाय लिहितो असे म्हणतात आणि ते खरेही आहे. पण एकदा स्वांतसुखाय लिहून झाले की ते वाचकांचे होते. साहित्य हे वाचकाला वाचावेसे वाटणे, त्याने साहित्याशी एकरूप होणे, तद्रूप होणे हा म्हणजे वाचनियता हा साहित्याचा एकमेव मानदंड आहे असे मला वाटतं.. साहित्य आणि मानवी जीवनाचा विचार मनात येतो तेंव्हा मला चक्रधर स्वामींच्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ठ आठवते.. साहित्य, मानवी जीवन हे हत्तीसारखे असते आणि आपण असतो पाहणारे, त्याचा अनव्यार्थ लावू पाहणारे, शोधू पाहणारे, त्या गोष्टीतील अंधांसारखे;  कारण आपण जे जीवन पाहतो, साहित्य वाचतो, लिहितो ते हिमनगाचे केवळ टोक असते. आणि शाश्वत निसर्ग आणि अशाश्वत माणूस याचा विचार करता ते तसे असणारही आहे. मी:- तुमची साहित्य लेखनामागची भूमिका काय आहे ? आनंदहरी :- फक्त साहित्यिक, विचारवंतांचीच नव्हे तर बहुतांशु व्यक्तींची विचार-आचाराची व्यक्तीगत अशी भूमिका असते, जी...
Read More

हिन्दी साहित्य – ☆ जीवनयात्रा ☆ मेरी सृजन-यात्रा – भाग – 1 ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ (हम स्वयं से संवाद अथवा आत्मसंवाद अक्सर करते हैं किन्तु, ईमानदारी से आत्मसाक्षात्कार अत्यंत कठिन है। प्रस्तुत है सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री भगवान् वैद्य "प्रखर" जी का आत्मसाक्षात्कार दो भागों में।) ☆ जीवनयात्रा ☆ मेरी सृजन-यात्रा  - भाग - 1 ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆ मैं कई बार, कई विषयों पर अपने-आप से अकेले में वार्त्तालाप  करता रहता हूँ। सलाह-मशविरा, जिरह करता हूँ, प्रश्न पूछता हूँ, खुद ही उत्तर देता  हूँ। पर यह कभी सोचा न था कि इस प्रकार की बातचीत में जो संवाद होता है, उसे कभी कागज पर उतारना पड़ेगा। सांगली की हमारी आत्मीय बहना, सुप्रसिद्ध मराठी लेखिका, यशस्वी अनुवादक सुश्री उज्ज्वला केळकर जी ने एक दिन दिलचस्पी दिखायी इस प्रकार की  ‘अपने-आप से बातचीत’ में और उसी का नतीजा है यह आत्म-साक्षात्कार:    प्रश्न: ‘प्रखर’ जी, हाल ही में आपको हैदराबाद का ‘आनंदऋषि साहित्य निधि पुरस्कार’ घोषित हुआ है। सबसे पहले तो उसके लिए आप हार्दिक बधाई स्वीकार करें । साथही, जरा यह भी बतलाइए कि यह किस...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी  आत्मसंवाद   ☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 3 ☆ श्री आनंदहरि  ☆ मी :- तुम्ही कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या आहेत.. आणखी काही लिहिले आहे का ? आणि ते कुठे कुठे प्रसिद्ध झाले आहे ? आणि  तुम्ही यापैकी नेमक्या कोणत्या साहित्यप्रकारात जास्त रमता किंवा तुम्हाला स्वतःला कोणत्या साहित्यप्रकारात लिहायला जास्त आवडते ? आनंदहरी :- खरे तर मी शब्दांत आणि माणसांत जास्त रमतो. मला वाटते वेगवेगळे साहित्यप्रकार ही फक्त वेगवेगळी रूपे आहेत याचा आत्मा एकच आहे. आपण व्यक्त होत असतो तेव्हा ते शब्दच स्वतःचे रूप घेऊन येत असतात असे मला वाटते. कथा, कविता, कादंबरी बरोबरच मी एकांकिका लिहिण्याचाही प्रयत्न केला.  मराठी- मालवणी बोलीत एक बाल एकांकिका लिहिली होती. ती मार्च २००७ च्या 'किशोर ' मासिकात प्रसिद्ध झाली . ती एकांकिका सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बसवण्यातही आली होती. अनेक मासिके, नियतकालिके अनियतकालिके, दीपावली अंक यामधून  तसेच काही वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांमधून साहित्य प्रसिद्ध झाले आहे. तसे मी फारसे काही लिहिले आहे असे मला वाटत नाही. पाऊलखुणा, वादळ आणि बुमरँग या तीन कादंबऱ्या,...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी  आत्मसंवाद   ☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 2 ☆ श्री आनंदहरि  ☆ मी :- पहिली कथा किंवा कविता कधी आणि कुठे प्रसिद्ध झाली. आनंदहरी :-  नोकरीच्या व्यापातून लिहिणे आणि प्रसिद्धीला पाठवणे तसे जमलेच नाही. त्यात स्वभाव भिडस्त त्यामुळे पुढे होऊन स्वतःबद्दल बोलणे, सांगणे, स्वतःला प्रमोट करणे जमायचे नाही, अजूनही जमत नाही. प्रारंभीच्या काळात एक दोन मासिकांना कथा आणि कविता पाठवल्या होत्या पण त्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे आपले लेखन अजून प्रसिद्धीयोग्य नाही असे वाटयाचे. नंतरही लिहीत होतो पण ते सारे वहीत असायचे. १९९५ ला सिंधुदुर्ग विभागात बदली झाली. लहान विभाग असल्याने कामाचा ताण कमी होता. वाचन आणि लेखन होऊ लागले. विभागीय मुख्यालय कणकवली येथे असल्याने तेथील आप्पासाहेब पटवर्धन नगरवाचनालयात साहित्यिक कार्यक्रम होत असत त्याला उपस्थित राहू लागलो. त्या दरम्यानच दै. पुढारीची सिंधुदुर्ग आवृत्ती सुरू झाली. शशी सावंत हे आवृत्तीप्रमुख होते. माझे कार्यालयीन सहकारी कवी सुरेश बिले यांच्यामुळे त्यांचा परिचय झाला होता. मी काहीतरी लिहितो हे त्यांना समजले होते. त्यांनी पुढारी आवृत्ती सुरू करतानाच 'नवांकुर 'ही साहित्यिक पुरवणी सुरू केली...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी आत्मसंवाद   ☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी ☆ ज्येष्ठ साहित्यिका, संपादिका  सौ. उज्वलाताई केळकर यांनी ई अभिव्यक्ती आत्मसाक्षात्कार साठी स्वतःच स्वतःची मुलाखत घेण्याबाबत सांगितलं तेंव्हा पहिल्यादा नाही म्हणलं तरी दडपण आले कारण ज्येष्ठतम साहित्यिका तारा भवाळकर यांचा आत्मसाक्षात्कार वाचला होता..त्यानंतरही काही मान्यवरांनी स्वतःच घेतलेली स्वतःची मुलाखत वाचली होती. आणि खरेतर  मुलाखत घेणं आणि देणं याचा फारसा काही अनुभव नसताना ही मुलाखत घ्यायची होती. उज्वलाताईंचा आदेश .. मग मीच माझे आयुष्य त्रयस्थपणे पाहण्याचा , स्वतःच्याच अंतरंगाशी , वर्तमानासह भूतकाळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेंव्हा एकच प्रश्न पडला… 'नाहीतरी, ' मी पणा' वगळून, स्वतःत त्रयस्थभाव आणून आपण स्वतःशी असा कितीसा संवाद करत असतो ? '  'मी' ला टाळता येत नसलं तरी 'मी पणाला' टाळण्याचा प्रयत्न करीत आत्मसंवाद साधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे हा आत्मसाक्षात्कार.. मी :- नमस्कार! आनंदहरी :- नमस्कार ! मी :-  प्रत्येकालाच स्वतःचा जीवनप्रवास हा काहीसा वेगळा आहे असे वाटत असते. तुमचा आजवरचा जीवन प्रवास कसा झाला ? आनंदहरी :-   आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखकाची लेखणीच त्याचे एक मन असते…. – भाग 3 ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक ☆ आत्मसंवाद – प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो – भाग 3 ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ आकाशातील असंख्य चांदण्या  काही ठळक असतात तर काही अस्पष्ट! कथाबीजांचे तसेच आहे. आपल्या अवती भवती अनेक घटना घडत असतात. त्यातील काही प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी निगडीत असतात तर काही ऐकलेल्या लेखकाला त्यातूनच कथा बीज मिळते आणि तो ते आपल्या प्रतिभा सामर्थ्याने फुलवत असतो अस्वस्थ करणारी कथाबीजे स्वस्थ बसू देत नाहीत. लेखणी- मी गप्प बसू देणार नाही. जवळच असलेली लेखणी मला पटकन म्हणाली तसं मी तिच्याकडं पाहिलं लेखणी- अगं मी म्हणजे तुझा कम्प्युटर गं मी पटकन जवळची लेखणी कौतुकाने हातात घेतली. मी- की बोर्ड जवळ तुलाही ठेवीन बरं कधी लेखणी तर कधी कम्प्युटर यांच्या मदतीने माझे कथालेखन होत होते. आपोआप हातात येते माझ्या माझे बरेचसे कथालेखन दिवाळी अंकांच्या निमित्ताने झाले. त्यातूनच कथासंग्रह तयार झाले. अंतरीच्या गूढगर्भी,दर्भाचा कावळा, धुक्यातली सावली,ऋणानुबंध, सांजवात,वैदेही, शिळेतील अहल्या,क्षितिज, बाहुली, ब्रह्मकमळ,जीवनगाणं,सार्थक, दोन ज्योती असे माझे प्रकाशित कथासंग्रह असून ब्रह्मकमळ हा पर्यावरण कथांच्या संग्रह आहे.लेखकाच्या लेखनाचा प्रारंभ हा बहुतेक कवितेने झालेला दिसतो.जे न देखे रवी ते देखे कवी अशी सुरु...
Read More

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखकाची लेखणीच त्याचे एक मन असते…. – भाग 2 ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक ☆ आत्मसंवाद – प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो – भाग 2 ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ लेखणी- माझ्याशी अशी खेळत कां बसलीस? मी- खेळत नाही.विचार करतेयं लेखणी- कसला विचार? मी- एवढी मोठी युगंधर कादंबरी वाचली त्यात कृष्णाच्या जीवनातील स्त्री मला आढळली नाही. मला फार राग आला आहे. मी लेखणीशी बोलत असतानाच मोबाईल वाजला. श्री.कुंदपसरांचा फोन होता. ते काही बोलण्यापूर्वीच त्यांना मी वाचलेल्या युगंधर कादंबरी बद्दल माझे मत सांगितले , ' सर, मला कृष्णाच्या जीवनातील स्त्रियांबद्दल लिहावेसे वाटते' लेखणीकडं बघत मी बोलले 'तुम्ही लिहा.. मी प्रस्तावना देतो. ' कामाबद्दल बोलून त्यांनी फोन ठेवला. लेखणी- झालं कां समाधान, गेला कां राग.आता लिही तुला काय हवं ते.मी तयारच आहे. माझे विचार आणि लेखणीचा झपाटा एकत्र आले. ऋणवेध कादंबरीचा जन्म झाला. दोन पुरस्कार घेतलेल्या या कादंबरीचे वाचन,इंग्रजी अनुवादित ऑडिओ बुक प्रसिध्द झाले. एकदा मस्तानी बद्दल संशोधनात्मक वाचले. मला मस्तानी खूपच चांगली वाटली. तिला न्याय मिळावा असे वाटू लागले. लेखणी- झाला ना विचार, आता  घे मला हातात आणि काम सुरु कर. लेखणीने राऊप्रिया कादंबरी  स्वीकारली. कादंबरी लेखन चालू असताना एक  दिवस मिरजेच्या ज्युबेली...
Read More
image_print