image_print

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी कविता ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी परिचय  नाव : - सौ . पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी शिक्षण : - बी कॉम, ए.टी.डी., आर्ट मास्टर आवड : - कविता करणे, वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिणे . वाचन आणि पर्यटन नोकरी : -  CBSE स्कुल मध्ये ड्रॉईंग टिचर म्हणुन सहा वर्ष कार्यरत आहे . कार्यशाळा : - कॅनव्हास पेंटीग, ओरिगामी, फ्लुएड आर्ट, क्राफ्ट वर्क पोत निर्मिती, बांधणी वर्क अशा अनेक कार्यशाळा मी घेते . फ्लुएड आर्ट : - यामध्ये ॲक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हासवर पेंटीग केले जाते . याचे पुर्ण किट मिळते. कॅनव्हास पेंटींग : - यामध्ये ॲक्रॉलिक, ऑईल कलर्स चा वापर करून पेंटीग केले जाते. ओरिगामी : यामध्ये पेपर च्या घड्या घालुन कागदापासून कलाकृती साकारली जाते . बांधणी वर्क : बांधणी वर्क च्या कार्यशाळे मध्ये वेगवेगळ्या प्रकारे बांधणीचे प्रकार शिकवले जातात . यामध्ये कापडावर बांधणी प्रिंट शिकवले जाते. क्राफ्ट वर्क : -  यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले पेपर पासून, कापडापासून बनविण्यास शिकविली जातात . तसेच नॅपकिन पासुन फुले व त्याचा बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठी क्लेपासुन छोट्या छोट्या कलाकृती करण्यास शिकविले जाते. व्हेजिटेबल, फ्रुट कार्व्हिंग : -...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 12 – नित्य तू जवळी रहा ……….  ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे ☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 12 ☆ ☆ नित्य तू जवळी रहा .......... ☆ सोबतीला तू हवा, दुसरे काही नको नित्य तू जवळी रहा,  मागणे दुजे नको !   याच त्या सुखी क्षणांचा, लागला  खे आहे लळा दिसणे तुझे, असणे तुझे, आणखी काही नको !   लिहून मी ठेविलें, माझ्याच या भाळी तुला पर्व हे सुरु जाहलें, वाढो त्याची कळा !   सात्त्विकता ही तुझी, आणखी देशील का रंगले मी तुझ्यात, तू ही माझ्यात रंगशील का?   गगनाहुनी ऊंच हा आनंद माझा वेगळा, सात्त्विकच्या रूपाने आयुष्य येई फळा !   © शेखर किसनराव पालखे  पुणे 17/05/20 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 1 – साक्षीदार ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे ( मराठी साहित्यकार श्री शेखर किसनराव पालखे जी  लगातार स्वान्तः सुखाय सकारात्मक साहित्य की रचना कर रहे हैं । आपकी रचनाएँ ह्रदय की गहराइयों से लेखनी के माध्यम से कागज़ पर उतरती प्रतीत होती हैं। हमारे प्रबुद्ध पाठकों का उन्हें प्रतिसाद अवश्य मिलेगा इस अपेक्षा के साथ हम आपकी  रचनाओं को हमारे प्रबुद्ध पाठकों तक आपके साप्ताहिक स्तम्भ - शेखर साहित्य शीर्षक से प्रत्येक शुक्रवार पहुँचाने का प्रयास करेंगे । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता  “साक्षीदार”) ☆ साप्ताहिक स्तम्भ - शेखर साहित्य # 1 ☆ ☆ कविता – साक्षीदार ☆   एका रमणीय भूतकाळाचा वारसा असलेलो आपण एका उध्वस्त होऊ घातलेल्या वर्तमानाचे साक्षीदार होऊन नक्की कुठे चाललो आहोत?... एका भयावह विनाशाकडे की त्याच्याही शेवटाकडे?... का उभे आहोत आणखी एका नवीन सृजनाच्या उंबरठ्यावर... याच अस्वस्थ जाणिवेच्या विवंचनेत घुटमळतोय माझा आत्मा... येऊ नये त्याच्याही आत्म्याच्या मनावर भूतकाळातील पापांचे ओझे... लाभो त्याला सदगती- हीच एकमेव सदिच्छा!!! तेवढंच करणं माझ्या हाती...   © शेखर किसनराव पालखे  पुणे 12-04-20  ...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते (समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  श्रवण माह पर विशेष कविता  “श्रावण येतो  आहे” ) ☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆   पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||धृ.||   घनगर्भित नभ गर्द सावळे, इंद्रधनुची अवखळ बाळे तनामनावर लाडे लाडे, कोण उचलूनी घेतो आहे? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||1||   भिजली झाडे,भिजली माती,सुगंध मिश्रीतअत्तरदाणी अन् चंदेरी गुलाबपाणी,  कोण धरेवर शिंपीत आहे? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने  आपली, श्रावण येतो  आहे. ||2||   श्रावण मासी,हर्ष मानसी,मनात हिरव्या ऊन सावली. रविकिरणांची लपाछपी ती,कोण चोरूनी बघतो आहे ? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ सुजित साहित्य – घुसमट…. ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम (सुजित शिवाजी कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अतिसुन्दर भावप्रवण कविता  “घुसमट*....”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )  ☆  सुजित साहित्य  –  घुसमट....☆    दिवसभर टपरीवर काम करून घरी गेल्यावर पोराला कुशीत घ्यायचं असुनही... कुशीत घेता येत नाही कारण... कपड्यांना येणाऱ्या तंबाखूच्या वासानं पोरगं क्षणभरही माझ्या कुशीत थांबत नाही तेव्हा वाटतं.. खरडून काढावा हा तंबाखूचा वास अगदी शरीराच्या कातड्यासकट जोपर्यंत दिवसभर पानाला कात लावून रंगलेले हात.. रक्ताने लाल होत नाही तोपर्यंत कारण.. दिवसभर ज्याच्या साठी मी जीवाच रान करून झटत असतो तेच पोरग जेव्हा माझ्याकडे पाठ करून आईच्या कुशीत शिरत तेव्हा काळजातल्या वेदनांना अंतच उरत नाही... आणि काही केल्या अंगाला येणारा तंबाखूचा वास काही जात नाही तेव्हा कुठेतरी...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 59 – मेघ बरसला आज…..☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे (आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  वर्षा ऋतू एवं श्रवण मास  पर आधारित  एक अतिसुन्दर कविता मेघ बरसला आज। श्री प्रभा जी की यह रचना  श्रवण मास का सजीव चित्रण है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।) खुप सुंदर श्रावण  असायचा बालपणीचा...झाडांचा..हिंदोळ्याचा..पानाफुलांचा ...देवदर्शनाचा..मेंदीचा...झिम्मा फुगडीचा ..... सगळ्यांना नव्या श्रावणाच्या शुभेच्छा ☘   ☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 59 ☆ ☆मेघ बरसला आज….. ☆   मेघ बरसला आज आल्या श्रावणाच्या सरी तुझी आठवण येता झाले कावरी बावरी   मेघ बरसला आज मन सैरभैर झाले तुझ्या निघून जाण्याचे दुःख पावसात ओले   मेघ बरसला आज सखे रिकामे अंगण मुके झाले आहे आज माझ्या पायीचे पैंजण   मेघ बरसला आज त्याला डोळ्यात जपला तुझ्या नसण्याने एका सारा खेळच संपला   © प्रभा सोनवणे  *अनिकेत* -१९९७) “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011 मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – हिरवा गाव – ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई (वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.) अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है ग्राम्य संस्कृति की झलक प्रस्तुत कराती एक भावपूर्ण कविता  हिरवा गाव. ☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – हिरवा गाव – ☆ हिरव्या साडीतली कुलीन  केळ। मांडवावरची  शालीन  वेल हिरव्या  पोरी  मारताहेत  भाव वसलाय तेथे हिरवा  गाव    ।।   गुलमोहोराचं गुलजार रूप प्राजक्त भोळा  फुललाय खूप पानांत रंगलाय पाखरांचा डाव वसलाय तेथे --------   शेवंती, चमेली, जाईजुई नाजुक काट्यांतून हसतय गुलाबाचं कौतुक कोरांटी, तगरीचा सरळ स्वभाव वसलाय तेथे --------   ऊंच माडांचे झुलताहेत पंखे सलामी देताहेत अशोक उलटे जास्वंद हसतेय लालम् लाल वसलाय...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆ फुलं ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे (वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “फुलं”।) ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆ ☆ फुलं ☆   हसतात फुलं, डोलतात फुलं काट्यांच्या सोबतीत वाढतात फुलं निरागस नि कोमल असतात फुलं रोजच रंगपंचमी खेळतात फुलं भेटेल त्याला आनंद वाटतात फुलं... कळ्या फुलतात, यवंनात आलेल्या मुलींसारख्या नाचतात माणसांच्या तालावर कुणी एखादा घरी घेऊन जातो फुलं घर सुवासानं भरून टाकावं म्हणून कुणी त्यांना देवाच्या पायावर वाहतो तर कुणी माळतो प्रेयसीच्या केसात कुणी फुलांच्या शय्येवर पोहूडतात एखादा करंटा मनगटावर बांधून घेऊन जातो त्यांना कोठीवर वापरून झाल्यावर पायदळी तुडवली जातात फुलं कुणाच्याही अंतयात्रेवर उधळली जातात फुलं सारा आसमंत दरवळू टाकतात फुलं तरीही नशिबावर कुठं चिडतात फुलं...   © अशोक श्रीपाद भांबुरे धनकवडी, पुणे ४११ ०४३. ashokbhambure123@gmail.com मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ उत्सव कवितेचा # 13 – रात्र – चित्र २ ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर (सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक 60 से अधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें बाल वाङ्गमय -30 से अधिक, कथा संग्रह – 4, कविता संग्रह-2, संकीर्ण -2 ( मराठी )।  इनके अतिरिक्त  हिंदी से अनुवादित कथा संग्रह – 16, उपन्यास – 6,  लघुकथा संग्रह – 6, तत्वज्ञान पर – 6 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  हम श्रीमति उज्ज्वला केळकर जी के हृदय से आभारी हैं कि उन्होने साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा के माध्यम से अपनी रचनाएँ साझा करने की सहमति प्रदान की है। आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता  ‘रात्र – चित्र २’ । ☆ साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा – # 13 ☆  ☆ रात्र – चित्र २ ☆ रात्र चंद्रबनातून अलगद उतरणारी मोगरीच्या सतेज ताटव्यात घमघमणारी पानांच्या चित्रछायेतून तरंगत जाणारी पुळणीवर जरा विसावणारी हातांशी लगट करणारी कानांशी कुजबुजणारी आलीआलीशी म्हणता म्हणता पार...क्षितिजापार होणारी रात्र   © श्रीमति उज्ज्वला केळकर 176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 9 ☆ किमया… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री (कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ किमया…”) ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 9 ☆  ☆ किमया… ☆ कोरड्या नदीला अपेक्षा पावसाची ओरडणाऱ्या पावश्याला आशा एक पर्जन्य थेंबाची..   स्वाती नक्षत्र पाऊस थेंब अगणित पडती तरी एकाच थेंबाचे शुभ्र वेधक मोती बनती..   गाईच्या कासेला गोचीड बिलगती सोडून पय अमृत रक्त प्राशन करिती..   पडला साधा पाऊस ओढ्यास पूर येई उन्हाळ्यात महानदी रखरखीत वाळवंट होई..   कुणास मिळे पुरणपोळी कुणास चटणी भाकर कुणी उपाशी तसाच असाध्य दुःखाचा डोंगर..   गरीब गरीब राहिले श्रीमंत, पैश्यात लोळले नाहीच काही जवळ धन कुणी मरण समीप केले..   खूप विचित्र गड्या निसर्गाची माया आलोत जन्मास भूवरी साधू काही छान किमया..   © कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री. श्री पंचकृष्ण आश्रम...
Read More
image_print