image_print

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – घरटं  – श्री सदानंद आंबेकर

श्री सदानंद आंबेकर            घरटं  श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास। कल आपने श्री सुजित  कदम  जी  का  मराठी आलेख – * घराचे घरपण * पढ़ा। आखिर चिड़िया का घोंसला भी तो घर ही है?  इसी क्रम में हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा  – “घरटं ” के लिए जो कि उनके जीवन के ही एक प्रसंग से प्रेरित है। ) शहरातील प्रसिद्ध समाजसेवक, अनेक धर्मार्थ संस्थांचे प्रमुख आणि नामवंत बिल्डर, डॉ प्रताप आपल्या बालकनी मधे त्यांच्या धर्मपत्नी सह बसून सकाळच्या चहा चा आनन्द घेत होते। देशकाळाची चर्चा होत असतांना अचानक प्रताप चे लक्ष बालकनी मधे ठेवलेल्या उंची लाकडी रॅक कडे गेले, त्यात सर्वात वरच्या कप्यावर दोन सुरेख लहानगे पक्षी येर-झार करीत होते। लक्ष देऊन पाहिले तर कळले कि ते वारंवार येत-जात, वाळके गवत, कापूस, पंख इत्यादि वस्तु आणून तिथे आपले एक घरटं बनवून राहिले आहेत।...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – * कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे  कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या (आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन) जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते  एवढयात  एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे  दिसायला सुंदर  गोरागोमटा स्मार्ट  अभ्यासातही चांगला  होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु  दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी,  "मेम याने मला मारलं". कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं  चिडून पाहिलं एकदोन वेळेस  मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल  नव्हता. एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क  दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं  तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * दुर्दम्य * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस दुर्दम्य (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की  एक भावुक लघुकथा दुर्दम्य। ) एssss सुनंदाsss अत्यंत चिरक्या आणि घोगऱ्या आवाजातली हाक आणि त्या पाठोपाठ दणदण पायऱ्या उतरणारी मोंगोल वळणाची , उमलू घातलेली, घट्ट दोन वेण्यांचे हेलकावे मिरवणारी मुलगी आणि तिच्या उतरण्याकडे अनिमिष नजरेने बघणारा जिन्याच्या पहिल्या पायरीवर असलेला पूर्ण पुरूषाच्या वाटेवरचा मोंगोल चेहरेपट्टीचा मुलगा ..काळजात चर्रर्र झालं ते दृष्य बघून ! मतिमंद म्हंटलीत तरी निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. शारीरिक बदलाची चाहूल आणि प्रीतीची कोवळीक नजरेत उतरली होती. पण ह्या साऱ्याचं रूपांतर कशात होणार ह्या जाणीवेने मात्र माझं मन सुन्न झालं, आणि झर्रकन् भूतकाळात गेलं. माझ्या कळत्या वयात एक कुटुंब आमच्या घराशेजारी राहायला आलं होतं. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा आजूबाजूच्या समवयस्क मुलांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला होता. त्याला आपल्यात खेळायला घेणं तर दूरच पण त्याच्या बोलण्यावर हंसणं, त्याच्यावर उगाचच दादागिरी करणं, त्याला चिडवणं हा त्या मुलांचा दिनक्रम ठरलेला. शेवटी वैतागून आईचं त्याला घरात डांबून ठेवणं आणि त्याने आसुसून खिडकीतून मुलांचे खेळ बघणं हे त्याने स्विकारलं होतं. काहीच दिवसांत त्यांची परत दुसऱ्या गांवी बदली...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – *ऊस डोंगा परी……..* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस ऊस डोंगा परी........ (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा ऊस डोंगा परी........। ) रात्रीची फ्लाईट घेतांनाच मनावर एक प्रकारचं दडपण आलं होतं. एयरपोर्टपासून घर बरंच दूर होतं. रात्रीच्या वेळी पायाखालचा रस्ता, सवयीची वळणं देखील अनोळखी भासू लागतात, रस्त्यावरचे दिवे बऱ्याचदा काळोखच उजळ करतायत की काय असा भास होत असतो. पण वेळेचं आणि पैशाचं  गणित सोडवण्याचा हाच एक उत्तम पर्याय असल्याने जिवाच्या कराराने शेवटी हाच निवडला , आणि आता ज्याची भिती वाटत होती तेच झालं. चांगली दीड तास लेट झाली होती flight! विमान लॅंड होऊन सामान मिळेपर्यंत ११.३० च वाजले होते. सामान घेऊन बाहेर पडले आणि रिक्षेवाले टॅक्सीवाले मागे पुढे घोटाळायला लागले, टॅक्सी की रिक्षा अशी दोलायमान स्थिती असतांनाच एक काळाकभिन्न,  राकट, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस जणू मला घेरल्यासारखाच जवळ आला. 'चला आपल्या रिक्षेत बसा, सामान द्या, तुम्ही व्हा पुढं!' मला हो नाही म्हणायची संधी ही न देता. जणू त्याने फर्मानच सोडलं त्याच्या रिक्षेत बसायचं. आणि त्याने एका माणसाला इशारा केला, त्यासरशी त्या माणसाने सराईतपणे रिक्षा जवळ आणून उभा केला आणि माझं सामान...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * तरूणाई * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस तरूणाई (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा तरूणाई। ) ‘आई मैत्री वेगळी, आणि व्यवसाय वेगळा’. व्यवसायात माझा पार्टनर म्हणून जरी आता तो राहिला नसला तरी आमच्यातली मैत्री तर तशीच आहे आणि तशीच राहणार. मित्र म्हणून तो आजही मला तितकाच आवडतो. नाही जमलं त्याला धंदा सांभाळणं, नाही मानवलं आम्हाला त्याचं व्यवसायाकडे दुर्लक्ष करणं. नविन नविन व्यवसाय, झोकून देऊन काम करून सुरूवात केली खरी आम्ही सगळ्यांनी, पण नाही राखता आलं त्याला उत्साहातलं सातत्य, देखरेखीतली जागरूकता, हिशेबातली सतर्कता! जाण असूनही नाही पेलता आली जवाबदारी, पण म्हणूनच दिला ना त्याला डच्चू! आम्हीच एकत्र बघितलेल्या स्वप्नाच्या मनोऱ्याचा एक खांब खणून बाजूला फेकतांना कोण यातना झाल्या आम्हाला, पण व्यवसाय सुरळीत चालावा, धंद्याला रूप यावं, म्हणून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला, आणि योग्य वेळी निर्णय घेतल्याचा समाधानाचा सुस्कारा देखील सोडला. पण याचा अर्थ असा नाही ना होत की पार्टनरशीप बरोबर दोस्तीचाही शेवट झालाय! अगं कधीही काही सल्ल्याची गरज भासली , तर आम्ही धाव घेणारच त्याच्याकडे! अगं काय सुपीक डोकं आहे त्याचं, काय भन्नाट कल्पना असतात त्याच्या, हा...
Read More

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – योग्यता – श्री सदानंद आंबेकर 

श्री सदानंद आंबेकर            योग्यता (श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास। हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा – "योग्यता " के लिए) शहरातील नामवंत ई एन टी तज्ञ डाॅ किशोर देशपांडे यांचा मोबाइल वाजत होता। आपल्या घरीच असलेल्या दवाखाण्यातून निघून बैठकीत पोहोचे पर्यंत सतत वाजत असलेल्या घंटी ने वैताग आणला, डाॅ साहेबांनी जसांच फोन कनेक्ट केला, दुसरी कडून गावी असलेली त्यांची आई म्हणाली- अरे किशोर, किती वेळानी फोन घेतो रे तू ? घरी कोणी नाही कां रे ? किंचित वैतागानी डाॅ उत्तरले- अगं आई, या वेळी आम्हीं दोघेहि पेशंट सोबत असतो ना, म्हणून गं वेळ लागला। हं, बोला , कसा काय फोन केला दुपारी ? आईने जुजबी विचारपूस केली नि पुढे म्हणाली- कां रे किशोर , तुझा आवाज इतका बसलेला कां बरं आहे? यावर डाॅ साहेबांनी उत्तर दिलं कि काही नाही, मागल्या आठवड्या पासून खोकला व...
Read More

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – आशिर्वादाचं पाकिट – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस आशिर्वादाचं पाकिट (e-abhivyakti welcomes Mrs. Jyoti Hasabnis who is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.)  कपाट आवरता आवरता एक रिकामं पाकिट दिसलं . जसं जपून ठेवलंय अगदी ! मनात विचार येतोय , रिकामं पाकिट कशासाठी जागा अडवून बसलंय फेकायला हवंय तेवढ्यात त्याच्या अक्षराने लक्ष वेधलं , बारीक बारीक डोळ्यांनी त्यावरचा मजकूर वाचला , चष्मा डोळ्यावर चढवला , पुन्हा पुन्हा वाचलं , हळूवार हात फिरवला त्यावर ...आईच्या सुरेख हस्ताक्षरांतलं तोंड भरून आशिर्वाद देणारं पाकिट होतं ते ! होतंच ते जपून ठेवण्यासारखं ! ते पाहिलं आणि मन जाऊन पोहोचलं माहेरच्या अंगणात ! आठवणींचे लक्षावधी फुटवेच फुटले मनात ! माहेरचं वारं काही वेगळंच असतं का ? अधिकच मंदशीतल  , गंधभरलं ! घराच्या कट्ट्यावरच्या रंगलेल्या तिच्याबरोबरच्या गप्पा अजूनही मनात ठाण मांडून आहेत अगदी बकुळफुलांच्या गंधासारख्या ! मुलांच्या धबडग्यात जो संध्याकाळचा वेळ मिळायचा तो असा खास दोघींचा ! संध्याकाळचं भणाण वारं अंगावर घेत जिव्हाळ्याच्या विषयांना कुरवाळत,  कधी दिवेलागण व्हायची कळायचं देखील नाही ! माहेरचं आभाळ काही वेगळंच असतं का ? त्या...
Read More
image_print