image_print

मराठी साहित्य – आलेख – प्रतिसाद – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस प्रतिसाद  (यह सत्य है  कि ईश्वर ने  मानव हृदय को साद-प्रतिसाद  के  भँवर में उलझा कर रखा है जबकि प्रकृति अपना कार्य करती रहती है। उसे प्रतिसाद से कोई लेना देना नहीं है। इस तथ्य पर प्रकाश डालती यह रचना सुश्री ज्योति हसबनीस जी के संवेदनशील हृदय को दर्शाती है।)  सरलेली संध्याकाळ, अलगद होणारं निशेचं आगमन, उगवतीचा चंद्र आणि आकाशातल्या चांदण्यांशी स्पर्धा करणारी चांदणफुलं अंगभर दिमाखाने मिरवणारा , दैवी सुगंधाने सारा भंवताल भारून टाकणारा डौलदार प्राजक्त .. आषाढाचे मेघ , श्रावणाची सर सारं काही अंगाखांद्यावर झेलून तृप्तीच्या हुंकारात लाल ,पिवळ्या ,गुलाबी ,जांभळ्या रानफुलांनी नटलेली देखणी सह्यपठारे ..उष:कालची तांबूस पिवळी आभा पांघरत कोवळ्या सूर्यकिरणांत लखलखणारी हिमशिखरे ..आपल्या ऋतुचक्रात सातत्य राखणारा निसर्ग असं विविधरंगी दर्शन देत साद घालत असतो , आणि आपण जसं जमेल तसं कधी अनाहूतपणे तर कधी आवर्जून याची दखल घेत प्रतिसाद देत असतो ,सृष्टीची ही रूपं नवलाईने न्याहाळत असतो , त्यातल्या अपूर्वाईच्या गोडीने नादावून जात असतो . खरं तर साद -प्रतिसाद हा खेळ मानवाचा , निसर्गाला त्याच्याशी काय देणं घेणं ? तुमच्या कौतुकाने...
Read More

मराठी साहित्य – आलेख – सुरेल संगत … – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस सुरेल संगत ... (Today we present wonderful article on music, songs and our moods written by  Mrs. Jyoti Hasabnis. She is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.)  एखादं गाणं जेव्हा मनात रूंजी घालू लागतं ना तेव्हा त्या शब्दांनीच जाग येते , त्याचे सूर दिवसभर संगतीला असतात आणि रात्री ते उशाशी घेऊनच त्याच्या तालावर झुलत आपण निद्रेच्या अधीन होतो . खरंच गीताची ही मोहिनी मनावर इतकी जबर्दस्त असते की त्या क्षणी जाणवतं , संगीत हा आयुष्याचा केवढा सुरेल भाग आहे ! रोजच्या नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्याची लय बिघडू न देण्यात ह्या शब्द सूरांचा केवढा मोठा वाटा आहे ! गाण्याचं सुद्धा असं असतं ना ,  गाण्याचे जसे भाव , शब्द ,  सूर , तसा मूड व्हायला लागतो . एखादं गाणं ऐकताक्षणी मूड अगदी प्रसन्न होतो . प्रसन्न मूड असला की मनात अगदी चांदणं फुललेलं असतं आणि त्या चांदणगावात चंद्र , तारका , आणि आपण एवढेच वस्तीला असतो , सूरावर झुलत असतो , ठेक्यात ताल धरत असतो  ' आ...
Read More

मराठी साहित्य – आलेख – पंडिता रायबाघन – श्री धीरज कुलकर्णी 

श्री धीरज कुलकर्णी  पंडिता रायबाघन (ही  फेसबुक पोस्ट  (13.12.2018) लिहिण्याअगोदर, granthalaya.org, पुणे नगर वाचन मंदिर आणि तिथले कर्मचारी यांचे मला आभार मानायचे आहेत ज्यांच्यामुळे मला संदर्भ अतिशय विनाकष्ट मिळाले. धन्यवाद.) दोनेक आठवड्यांपूर्वी फोलिएज ग्रुपतर्फे आम्ही dukes nose ते उंबरखिंड असा ट्रेक केला. खरेतर ट्रेक नाहीये तो. Descent आहे. म्हणजे डोंगर उतरायचा. तर असो.  एकंदरीत जाम थकवणारा प्रकार होता. पण मजा आली. या ट्रेकचे फलित म्हणजे यापूर्वी मला माहित नसलेली उंबरखिंडची लढाई यानिमित्ताने अतिशय सविस्तर समजली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ज्या 27 लढायांमध्ये भाग घेतला त्यापैकी ही एक लढाई.  शक्तीपेक्षा चातुर्याने युद्ध करून स्वतःची कमीतकमी हानी होऊ देत, महाराजांनी ज्या प्रकारे हे युध्द जिंकलं, तो इतिहास ऐकताना खरोखर रोमांच उभे राहतात. या युद्धाच्या वर्णनात एक नाव वारंवार कानावर पडत होते… पंडिता रायबाघन. या युद्धात औरंगजेबाकडून लढलेल्या या स्त्रीने, अखेर पराभव समोर दिसल्यानंतर कारतलबखानास, महाराजांशी तह करायला लावला एव्हढी हकीकत इथे समजली.  पण हिच्याविषयी कुतूहल जागृत झालं. परत आल्यानंतर,  गुगलकडे थोडी शोधाशोध केली. त्यावेळी granthalaya.org इथून समजलं की तिच्याबद्दल नयनतारा देसाई यांनी 1979 साली पुस्तक लिहिलं...
Read More
image_print