मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आधुनिक मूलभूत गरजा… – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री आशीष बिवलकर आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तुझ्या माझ्या अंगावर… – चित्र एक काव्ये दोन ? श्री आशिष बिवलकर आणि AK (काव्यानंद) मराठे

( १ ) 

श्री आशिष बिवलकर

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं 

तुझ्या माझ्या अंगावर केळ्याचं पान नवं 

नव्या पानांमंदी नवीन काय दडलं

तुझ्या माझ्या इचाराने अंगावर चढलं

*
केळी येतील, केळी जातील

घङ भरलं, सुख येईल

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

☆ ☆ ☆ ☆

( २ )

फोटो सेशन झालंय पटकन

बदलून घ्या कपडे

उनाड म्हशी लागतील मागं

होईल भलतेच लफडे ll

*
त्यांना धोतर कळत नाही

कळत नाही लुगडे

व्याजासकट मुद्दल खातील

तुम्हीच पडाल उघडे ll

*
केळीची पाने कुरचुक कधी

फाटतील कोण जाणे

नको तिथे फाटली तर

अवघड होईल जगणे ll

© कवी : AK (काव्यानंद) मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आरसा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आरसा … ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

आरसा नेहमी खरं बोलतो

असं नेहमी सारेच बोलतात

आरशाचे डोळे मागे कुठे बघतात

*
पुढचंच तेवढं आरसा दाखवतो

त्याची मर्यादा तो जाणून असतो

आपण मात्र खुळ्या कल्पनेत फसतो

*
आरसा कामापुरताच वापरावा

सत्यासत्येतेचा गुंता आपणच सोडवावा

आरसा कधीच धरू नये पुरावा – – – 

आरसा कधीच धरू नये पुरावा – – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कदंब फुलतो… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कदंब फुलतो… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त अनलज्वाला, मात्रा-8+8+8=24) 

गडगडणारा ढग येताना कदंब फुलतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||ध्रु||

*

वरीसवे हलती त्याच्या धुंद शलाका

यमुनाजळही खळखळ खळखळ देते हाका

कान्हासंगे वृंदावनात खेळ खेळतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||1||

*
चेंडू सुमने केशर कांती फांदीवरती

कान्हासंगे गोप खेळती अवतीभवती

अमृत प्राशन केल्याने हा अखंड झुलतो 

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||2||

*
कदंब-नीला वाहत येतो गंधित वारा

कादंबरीस म्हणती सारे कदंब मदिरा

कुसुमामधला सुगंध त्याचा मंजुळ घुमतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||3||

*
सोनवर्खिली मोहक सुमने सुगंध देती

कृष्णसख्याला प्रियक होवुनी जवळी घेती

कदंबोत्सवी मम् शब्दांनी उमल उमलतो

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||4||

*
सोन केशरी गुबगुबलेली फुले सुगंधी 

मधमाशांचे मोहळ उठते मिळता संधी

शिशुपाल कुणी कुणी हरिप्रिया म्हणुनी गणतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तुळस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ तुळस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

हिरवे काळे कुळ माझे 

औषधी गुणांनी युक्त,

एक पान खा सकाळी 

कफा पासून व्हा मुक्त!

*

फुलांस म्हणती मंजिरी 

त्यात लपती माझ्या बिया,

येतील उपयोगी तुमच्या 

नवीन रोपटे रुजवावया!

*

जगी खास वनस्पती 

मलाच विवाहाचा मान,

पूजेत सत्यनारायणाच्या 

वाहतात सहस्त्र पानं!

*

शोभा वाढवी अंगणाची 

घरा समोरच्या वृंदावनी,

सांज होता मज जवळी 

दिवा लावती सुवासिनी!

*

वीस तास दिसातले 

सोडते प्राणवायू हवेत,

लावून परिसरात रोपं 

करा प्रदूषणावर मात!

करा प्रदूषणावर मात!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संक्रांतवेल मनोहर… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संक्रांतवेल मनोहर …  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

बहरून आली पानोपानी

कांती केशरलेली

संक्रांतवेलही दवबिंदूसह 

गगनाला भिडण्या गेली

*
झिरमिर झिरमिर झिरमाळ्यांचे

गुच्छ लगडले सारे

झोके देती हलके छेडत

पवनाचे धुंद इशारे

*

थडथडणारी थंडी त्यातच 

बहरून बहरून जाते

केशरी शेला अहा लपेटून 

मनात माझ्या गाते

*

गंध नसे पण रंग देखणा

नजर सुखावून जाते 

स्वागत करती गुच्छ साजरे

गगनाशी यांचे नाते

*
चिवचिवणारे पक्षी येऊन

घरटी त्यावर विणती

महावेल म्हणुनी होते 

संक्रांतवेलीची गणती

*

दुरून वाटते आग लागली 

वेलीवरती सारी 

उत्तरायण आले आले 

शुभपर्वाची नांदी न्यारी

*
थंडी मधला शेला झाला

शब्दांचा माझ्या सुंदर

मम काव्यात बहरून आली

संक्रांतवेल मनोहर…

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “घाणेरी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – घाणेरी – ? ☆ श्री सुहास सोहोनी

हो मी घाणेरी, घाणेरी, कुणी हसा वा चिडवा;

नाही करणार कधी, बागेतल्यांचा मी हेवा… 

*
शालू हिरव्या पानांचा, त्याला कातरी किनार;

रंगरुपाने देखणी, बहुगुणी अशी नार… 

*

काया काटेरी तरीही, फळे असती मधूर;

श्रावणातल्या पाण्याचे, मला सुखावती सूर… 

*
चार कौतुकाच्या ओळी, लिहिल्या ना माझ्यावर;

दुर्लक्षिती सारे तरी, नाही घेत मनावर… 

*

कुणी घेईल जवळ, किती वाट मी पाहते;

खंत उरातली माझ्या, कवीमनाला कळते..

*

वईदांड्यातून आता, आले आहे मी बागेत;

कधीतरी मिळेलच, स्थान फुलांना पुजेत… 

*

छान दिसणे असणे, फार फरक दोन्हीत;

दु:ख पचवून सारे, द्यावा आनंद हसत… 

*

ऋतू येतील जातील, खंत कशाला करावी;

जिद्द आणिक उमेद, जगण्याची ना सोडावी… 

*

गूज सांगून मनीचे, झाले मोकळी मोकळी;

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

🌹

कवी : मेधानुज

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नारी शक्ती असते भारी 

देई प्रत्‍यय प्रसंगोत्‍पात,

तूच मायेचा असशी झरा 

किमया दाविसी विश्वात!*

होम करुनी अष्टमीला

तुझे स्तवन करती भक्त,

रात जागवुनी सारेजण

खेळती दांडिया मनसोक्त!

*

कधी होऊनि रणचंडीका 

करशी पाडाव दैत्याचा,

येता कोणी शरण तुजला 

उद्धार करशी त्याचा!

*

नऊ दिसाचे नऊ रंग 

शोभून दिसती तनुवरी,

तूच एक जगन्माता

साऱ्या विश्वाची संसारी!

*

अष्टभुजांनी सांभाळशी 

सकल विश्वाचा पसारा,

नमन करुनी आदिमायेस

करू साजरा दशमीला दसरा!

…करू साजरा दशमीला दसरा!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सारेच कर्मयोगी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सारेच कर्मयोगी…? श्री आशिष  बिवलकर ☆

कर्मयोगी पहा | एका चौकटीत |

सर्व समर्पित | समाजासी ||१||

*

बाबा आणि माई | कुष्ठरोगी सेवा |

मानवता ठेवा | जीवनात ||२||

*

प्रकाशाची वाट | होती अवघड |

तिची धडपड | त्याच्या संगे ||३||

*

दिगंत आरती | आणि अनिकेत |

तत्पर सेवेत | वारसाने ||४||

*

हेमलकसात | प्रकल्प उभारी |

लोक बिरादरी | सेवाकार्य ||५||

*

वन्यजीव सेवा | आरोग्य शिक्षण |

कार्य विलक्षण | निस्वार्थाने ||६||

*

साधेपणा हाच | शोभे अलंकार |

नसे अहंकार | आमटेंना ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोकर्णी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गोकर्णी…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त: उद्धव, मात्रा: 2+8+2+2=14)

गोकर्णी मजला भासे

अपराजिताच मनभावन

मधुमास असो फुलणारा

वा रिमझिमणारा श्रावण

*

ही श्वेतांगीही फुलते

पोपटल्या पानी खुलते

वेलींच्या हिंदोळ्यावर

मग मोहरूनही झुलते

*

देवालय माझे सजते

चिंतामणी रंग दिसावा

किरिटावर धारण करुनी

तो कान्हा गोड हसावा

*

सुपली म्हणती हिज कोणी

कोणी गौर्याही म्हणती

नावातच आहे जादू

मज भासते जणू पणती

*

ही वैद्यच आहे घरची

व्याधींवर उपाय करते

विष्णुकांतेस या मीही

मग नेमाने बघ जपते

*

आभास होतसे मजला

फुलपाखरे जणू उडती

वेलींवर इकडे तिकडे

गोकर्णरुपे बागडती

*

ती सखी होवुनी माझी

खिडकीवर माझ्या येते

हितगुज माझ्याशी करता

मी कविता तिजला देते

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मेंदी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मेंदी… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

सांगते मेंदी कानी आज तिची सुरेख कथा गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

शेवाळी हिरवे पावडरचे रूप बालपण सांगते

आठवणीतूनी तिच्या याच माहेरपण डोलते

पाण्यामध्ये मिसळताच सांगे सासरी जाणार आता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

मेंदी सजली हातावरी जशी पोर आली सासरी

लालीमा देत हाताला सूरात नाहली पावरी

सहजता भरली त्यामध्ये जसा हले पापणीचा भाता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

उतरला रंग तरी थोड्या खुणा वार्धक्य हे आले बाई

दुजाचे जीवन खुलवायचे सांगे थकायचे मुळीच नाही

नव्या दमाने येईन अवचित पुसून ही जाता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

तीन अवस्था या जरी माझ्या आहेत तुझ्यापरी गं

जगून घे सासरी पोरी रंग जीवनी भरी गं

सार्थकी लागेल जिणे तुझे चटके सोसता सोसता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares