image_print

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मी प्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  ✈️ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग✈️ पीटर्सबर्गजवळील पीटरहॉप हे एक अतिशय रम्य, भव्य आणि देखणे ठिकाण आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन  १७०५ मध्ये पीटर दि ग्रेटने या जागेचा विकास करण्याचे ठरवले. दीडशे हेक्‍टरहून अधिक जागा व्यापलेल्या या भव्य परिसरामध्ये राजवाड्यासारख्या एक डझनाहून अधिक इमारती आहेत. ११ भव्य व सुंदर बगीचे झाडा फुलांनी, शेकडो सुंदर पुतळ्यांनी नटलेले आहेत. या बगिच्यातून २०० हून अधिक, तर्‍हेतर्‍हेची कारंजी आहेत. अप्पर गार्डन आणि लोअर पार्क यांच्या मध्यावर ग्रेट पॅलेसची वास्तु उभी आहे. पीटरहॉपपासून वीस किलोमीटर दूर असलेल्या उंच टेकड्यांवरील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी अप्पर गार्डनमधील तीन-चार मोठ्या तलावात साठविले आहे.  तिथून पाईपलाईन बांधून लोअर पार्कमधील कारंज्यांमध्ये पाणी खेळविले आहे. अप्पर गार्डन लोअर पार्कपेक्षा साठ फूट अधिक उंचीवर आहे. सर्व कारंजी इलेक्ट्रिक पंपाशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर चालतात. या वॉटर सिस्टिमचे सर्व डिझायनिंग पीटर दि ग्रेटने स्वतः केले होते. अप्पर गार्डन व लोअर पार्क यांच्या मध्यावरील ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात अतिशय भव्य असा 'ग्रेट कास्केड'...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ✈️ मी प्रवासीनी ✈️ ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर उभारलेले सेंट आयझॅक  कॅथेड्रल म्हणजे वास्तुशास्त्र आणि इंजीनियरिंग यांचा अजोड संगम आहे. कास्ट आयर्नच्या मुख्य घुमटाभोवती चार छोटे डोम आहेत. या सर्वांना सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यासाठी ४०० किलोहून अधिक सोने वापरण्यात आले आहे. बाहेरील भव्य खांबांवर कमळे, सुंदर पुतळे, पुराणकथांची शिल्पे खूप सुंदर आहेत. बसमधून फिरताना शहरातील सुंदर बागा,पॉपलार,ओक,बर्च यांचे भरदार उंच  वृक्ष,  कारंजी, शैक्षणिक संस्था  नाट्यगृहे, लायब्ररी,बॅ॑का यांच्या भव्य इमारतींवरील देखणे पुतळे लक्ष वेधून घेतात. पहिला पीटर म्हणजे पीटर दि ग्रेट याने १७०२ मध्ये स्वीडनचा पराभव करून नीवा नदीच्या मुखावरील रशियाचा किल्ला परत जिंकून घेतला. नीवा नदी बाल्टिक समुद्राला मिळते. त्यामुळे रशियाचा बाल्टिक समुद्रामधून युरोपीयन देशांशी व्यापार चालू राहिला. आरमारी वर्चस्व कायम राहिले. पीटर दि ग्रेटने  पीटर्सबर्ग या सुंदर शहराचा पाया घातला. कित्येक वर्षं पीटर्सबर्ग हेच राजधानीचे ठिकाण होते. मध्यंतरी काही काळ या शहराला लेनिनग्राड असे संबोधण्यात येत असे. आता पूर्वीचे पीटर्सबर्ग हेच नाव आहे व राजधानी...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मी प्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  ✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग    या हर्मिटेजमध्ये असंख्य प्रकारची घड्याळे आहेत. हिरे जडविलेली, लहान, गोंडस बाळांच्या हातात असलेली,होडीच़्या आकारातील, पऱ्यांनी हातात धरलेली, खांबांवर बसविलेली अशा अनेक तऱ्हा. या साऱ्यांमध्ये मोराचे घड्याळ अप्रतिम आहे. सोन्याचा मुलामा दिलेल्या एका गजांच्या पिंजऱ्यासारख्या घरामध्ये, सोनेरी मोर आपला निळा जांभळा रत्नजडित पिसारा फुलवून उभा आहे. त्याच्या पायाशी एका बाजूला एक मोठा लाल सोनेरी कोंबडा आहे. दुसऱ्या बाजूला खारुताईच्या डोक्यावर एक छोटा गोल आहे. कोंबड्याचा पोटात असलेली किल्ली फिरवून ठेवली की दर एक तासाने कोंबडा आरवे. कोंबडा आरवला की खारुताईच्या डोक्यावरील गोल पिंजरा फिरू लागे व त्याच्या घंटा मंजुळ वाजू लागत. घंटा वाजायला लागल्यावर मोर पिसारा फुलवे.  तांब्यावर सुवर्ण मुलामा दिलेली ही कलाकृती, त्यातील नाजूक यंत्रणेमुळे आता चालविण्यात येत नाही. पण नजाकतीने पिसारा उभारलेला मोर मनामध्ये कोरला जातो. मोराच्या पिंजऱ्यापासून जवळ मोझॅक टाइल्समध्ये काढलेली माणसांची, पक्षी-प्राण्यांची अप्रतिम चित्रे आहेत. तर जवळच्या एका चहा टेबलाची षटकोनी नक्षीही मोझॅक टाइल्समधील  आहे. पाणी भरायला आलेल्या दोन...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी मी प्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  ✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग ✈️ राजधानी मॉस्कोनंतर रशियातील महत्त्वाचे शहर म्हणजे सेंट पीटर्सबर्ग. पीटर्सबर्गला आलो तेंव्हा सूर्य मावळायला बराच वेळ होता. आमची गाईड नादिया हिच्याबरोबर छोट्या बसने शहराचा फेरफटका मारायला निघालो. पीटर्सबर्गच्या वायव्येला लादोगा या नावाचे युरोपमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरातून नीवा नदीचा उगम होतो. या नदीवर जवळजवळ चारशे ब्रिज बांधलेले आहेत.नीवा,मोइका आणि फोंटांका   अशा तीन नद्या पीटर्सबर्ग मधून वाहतात. त्यांच्या कालव्यांनी पीटर्सबर्ग शहर आपल्या कवेत घेतले आहे. कालव्यांवरील पूल ओलांडून बस जात होती. सहा पदरी स्वच्छ रस्ते व दोन्ही बाजूला पंधरा-पंधरा फुटांचे सुरेख दगडी फुटपाथ होते. दुतर्फा एकाला एक लागून दगडी, सलग तीन चार मजल्यांच्या इमारती होत्या. लाल, पिवळ्या,निळसर रंगांच्या त्या इमारतींना मध्येमध्ये नाजूक जाळीदार गॅलेऱ्या होत्या. बऱ्याच इमारतींच्या खांबांवर तगड्या दाढीधारी पुरुषांचे शिल्प दोन्ही हात पसरून जणू इमारतींना आधार देत होते. तर काही ठिकाणी काळ्या रंगातील पऱ्यांची देवदूत आंचे शिल्प होती निवा नदीच्या एका काठावर उतरलो.  नदीच्या काठावर  खूप...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-११ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मीप्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ११ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  'भीषण सुंदर' सुंदरी आणि चंद्रमुखी🐆🐆 दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पच्या शेजारी असलेलं म्युझियम पाहिलं. त्यात वाघ, इतर वन्य प्राणी, मगरी, पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळ्या जातीची तिवरं, त्यांचे उपयोग असं दाखवलं होतं. तिथून खाली दिसणार्‍या मोठ्या तळ्यात मगर पार्क केलं होतं .सुंदरबनच्या बेटसमूहांचा मोठा कॉ॑क्रीटमधला नकाशा फुलापानांनी सजलेल्या बागेत होता. आज सुंदरबनातून परतीचा प्रवास होता. येताना काळोखात न दिसलेली अनेक राहती हिरवी बेटं, त्यावरील कौलारु घरं, शाळा,नारळी- केळीच्या बागा आणि भातशेतीच्या कामात गढलेली माणसं दिसत होती.  खाडीचं खारं पाणी आत येऊ नये म्हणून प्रत्येक गावाला उंच बंधारे बांधले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हॅमिल्टन नावाच्या गोऱ्या साहेबानं गोसाबा या बेटावर स्थानिकांनी तिथे रहावं म्हणून शेतीवाडी, शिक्षण, हॉस्पिटल, रस्ते या कामात मदत केली. तो स्वतःही तिथे रहात होता. या बेटावरील त्याचा जुना, पडका बंगलाही पाहायला मिळाला. रवींद्रनाथ ठाकूर यांनी दोन दिवस वास्तव्य केलेली, छान ठेवलेली एक बंगलीही होती. गोसाबा बेटावरचे हे गाव चांगलं मोठं, नांदतं होतं. तिथलं पॉवर हाउस म्हणजे जंगली...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मीप्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदलपूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने  होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून  प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्‍या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-८ – सिंहगिरीचे शिल्प काव्य ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मीप्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ८ – सिंहगिरीचे शिल्प काव्य ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  विशाखापट्टणम हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. या नैसर्गिक बंदरातून दररोज लक्षावधी टन मालाची आयात- निर्यात होते. जहाज बांधणीचा अवाढव्य कारखाना इथे आहे. विशाखापट्टणम हे ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय  आहे. आम्ही इथल्या ऋषिकोंडा बीचवरील आंध्रप्रदेश टुरिझमच्या 'पुन्नामी बीच रिसॉर्ट' मध्ये राहिलो होतो. ऋषिकोंडा बीच ते भिमुलीपटनम असा  हा सलग बत्तीस किलोमीटर लांबीचा अर्धचंद्राकृती स्वच्छ समुद्र किनारा आहे. निळ्या हिरव्या उसळणाऱ्या लाटा गळ्यात पांढर्‍याशुभ्र फेसाचा मफलर घालून किनाऱ्यावरील सोनेरी वाळूकडे झेपावत होत्या. किनाऱ्यावरील हिरवळीने नटलेल्या, फुलांनी बहरलेल्या बागेत नेव्हल कमांडच्या बॅण्डचे सूर तरंगत होते. समुद्र किनार्‍यावरच पाणबुडीतले आगळे संग्रहालय बघायला मिळाले.' आय एन एस कुरसुरा' ही रशियन बनावटीची पाणबुडी १९७२ च्या पाकिस्तानी युद्धात कामगिरीवर होती. ९० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद असलेल्या या पाणबुडीचे आता संग्रहालय केले आहे. आतल्या एवढ्याश्या जागेत पाणबुडीच्या सगळ्या भिंती निरनिराळे पाईप्स, केबल्स यांनी व्यापून गेल्या होत्या. छोट्या-छोट्या केबिन्समध्ये दोघांची झोपायची सोय होती. कॅप्टनची केबीन, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह सारे सुसज्ज...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-७ – क्रोएशियाचे समुद्र संगीत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी  मीप्रवासीनी  ☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ७ – क्रोएशियाचे समुद्र संगीत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  क्रोएशियाला  एड्रियाटिक सागराचा ११०० मैल समुद्र किनारा लाभला आहे. दुब्रावनिक या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावरील शहरात पोहोचताना उजवीकडे सतत निळाशार समुद्र दिसत होता. त्यात अनेक हिरवीगार बेटे होती. क्रोएशियाच्या हद्दीत लहान-मोठी हजारांपेक्षा जास्त बेटे आहेत. त्यातील फार थोड्या बेटांवर मनुष्यवस्ती आहे. काही बेटांवरील फिकट पिवळ्या रंगाची, गडद लाल रंगाच्या कौलांची टुमदार घरे चित्रातल्यासारखी दिसत होती. समुद्रात छोट्या कयाकपासून प्रचंड मोठ्या मालवाहू बोटी होत्या. डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर दगडी तटबंदीच्या आत लालचुटुक कौलांची घरे डोकावत होती. गाइडबरोबर केबलकारने एका उंच मनोऱ्यावर गेलो. तिथून निळ्याभोर एड्रियाटिक सागराचे मनसोक्त दर्शन घेतले. गार, भन्नाट वारा अंगावर घ्यायला मजा वाटली. तिथून जुने शहर बघायला गेलो. जुन्या शहराभोवती भक्कम दगडी भिंत आहे. दोन किलोमीटर लांब व सहा मीटर रुंद असलेल्या या खूप उंच भिंतीवरून चालत अनेक प्रवासी शहर दर्शन करीत होते. दगडी पेव्हर ब्लॉक्सच्या रस्त्यावर एका बाजूला चर्च व त्यासमोर ओनोफ्रिओ फाउंटन आहे. रोमन काळात दूरवरून पाणी आणण्यासाठी खांबांवर उभारलेल्या पन्हळीमधून उंचावरून येणारे पाणी...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ✈️ मीप्रवासीनी ✈️ ☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ - सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  टर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवास करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो.  क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न  देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे. रोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या  सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह  लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या...
Read More
image_print