मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कनकभरली फुले… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कनकभरली फुले… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या 16 यती 8 व्या अक्षरावर)

उंच उंच डोंगरात झाडेवेली घनदाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||ध्रु||

*

रिमझिम रिमझिम पावसाच्या येती सरी

घाटाघाटातली झाडी वेली त्यात रंग भरी

कनकभरली फुले सोनमोहोराचा थाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||1||

*

हिरव्यात डोकावती पहा देखणी पिवळी 

पर्ण पाचूवर आली कळी कोवळी कोवळी

मधू प्राशनास धावे फुलपाखरु सुसाट

किती सारी साजरी धुकं भरली पहाट ||2||

*

वाटा वळणे वळणे झरे पाण्याचे खेळणे

ताम्रफुले पहुडली त्यांचे मातीशी लोळणे

पायघड्या देखण्याश्या वारा घालतो मोकाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||3||

*

माकडांचे लोट आले इकडे तिकडे पळे

ताम्रशेंगा पितवृष्टी खळखळून ओघळे

माझ्या कवन शेल्याला पितंबरी ताम्र काठ

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||4||

*

कुठे बेफाटला वारा कुठे पाऊस सरारा

ताम्रवृक्ष उंच उंच फुले घागरा गरारा

ओंजळीत सोनफुले शब्दांची वाहती लाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळ… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बकुळ… ?

बकुळीच्या झाडाखाली 

 वेचत असता फुले 

मनाच्या ओंजळीतून 

 खूप काही सांडले 

*

वेचता वेचता फुले 

 लहानपण आठवले

उशीर झाला म्हणून 

 पाठीतले धपाटे आठवले

*

एक फूल माझ्याशी 

 व्यथा मांडून गेले 

तेव्हापासून मनात

 त्याचे दुःख कोरले गेले

*

हल्ली मला उचलून घ्यायचे 

 कष्ट कुणी घेत नाहीत

तसंही मला माळण्यासाठी

 लांब केसही उरले नाहीत

*

दोन वेण्यातली परकरी नात 

 बघता बघता गायब झाली

सर ओवत बसलेली 

 आजीही नजरेआड गेली

*

बरं झालं तू आलीस 

 ओंजळ तुझी भरली 

कुणीतरी आमची 

 दखल आज घेतली

*

माहिती आहे मला 

 माझे जीवन एका दिसाचे 

पण व्रत मात्र आमचे 

 अव्याहत सुगंध लुटायचे

*

रोज झाडावरून ओघळून 

 जमिनीकडे झेपावतो

तेव्हाच आमच्या मनात 

 विचार एक येतो

*

असो जीवन एक दिवसाचे,

 आपण सुगंध लुटावा

प्रत्येकाच्या आयुष्याचा 

 माझ्यापरी बकुळ व्हावा 

*

सुकून गेलो तरीही 

 गंध मागे ठेऊन जातो

प्रत्येकाच्या हृदयात 

 अविरत मी दरवळतो

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९९ ☆ सहचर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९९ ?

☆ सहचर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

प्रियतम,

सहचर…पतिपरमेश्वर,

नात्याला नाव नसतं,

असतात जाणिवा,

खूप काही,

आपसूकच मिळालेलं…

असतीलच काही उणिवा !

 

तू गेल्यानंतर,

जाणवतंय तुझं अस्तित्व,

तुझी चप्पल, शूज, स्वेटर,

कशाकशात!

 

ठरवलंय,

तुझ्याच चष्म्यातून,

पहायचं जग,

आणि ते नातंही ठेवायचं,

अभंग !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अव्यक्त ! ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

? कवितेचा उत्सव ?

☆ अव्यक्त ! ☆ श्री विश्वास दाते ☆

म्हटले नाहीस कधी तू “आय लव यू”

म्हणणे मला न जमले “आवडतेस मला तू” l

*

अंगी भरून थंडी आला कधीही ताप

रात्री उठून बघशी गेला की नाही ताप l

*

लागले कधी जाऊ एकमेकापासून दूर

दिनराती लागते मनी अनामिक हुरहूर l

*

वाटे जर कधी आज चापून खावे वडे

काही न सांगताही, वडा ताटात की पडे l

*

निशब्द जवळी असता, उरी आनंदाचे सडे

एकास काही होता ऊर दुसऱ्याचे धडधडे l

*

पटले उभयतांना हा वेगळाच संग

काही न बोलताही, मनी वाजती तरंग l

*

लपविली उरीची चिंता कितीही जरी

उमजे लगेच दुसऱ्या तीही का सत्वरी l

*

जीवास शांत वाटे संगतीचा न ये कंटाळा

झाला अबोला तरीही मनी येई न मेघ काळा l

*

कळते तुला कधीही स्तिथी माझ्या मनाची

सहजी मलाही उमजे भाषा तुझ्या तनूची l

*

प्रेम प्रेम म्हणतात ते याहून का वेगळे

जाहिरात न करता, करतात हेच सगळे l

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१४ ☆ फुलांना वेचल्यानंतर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१४ ?

☆ फुलांना वेचल्यानंतर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सुखाने मी निघालो बघ यमाने गाठल्यानंतर

जराही दाह होईना कलेवर पेटल्यानंतर

*

असे चटके दिले त्यांनी इथे सोशीक लोकांना

जखम होते बरी म्हणती मिठाने शेकल्यानंतर

*

किती गर्दी इथे केली बघ्यांनी रंजनासाठी

कुणीही थांबला नाही तमाशा संपल्यानंतर

*

अनोखी कल्पना शक्ती जिथे रचनेत सापडते

कवीला वाचता येते कवन हे वाचल्यानंतर

*

इथे तर रानमेव्याला कुणीही मोल देईना 

सुक्यामेव्यास या किंमत बघाना वाळल्यानंतर

*

फुले रस्त्यात पडलेली चुरडली ना कधी पायी

सुगंधी हात झाले रे फुलांना वेचल्यानंतर

*

सुखाचा शोध घेताना भटकलो काल मी होतो

सुखाला जाणता आले समाधी लागल्यानंतर

*

कसे घरट्यात ते घुसले किती दादागिरी केली

अता बंदिस्त हे पाणी जहाले गोठल्यानंतर

*

दुधाची काळजी नाही जरी ते नासले आहे

कलाकंदामधे गोडी जरासे आटल्यानंतर

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कली-दुनिया… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कली-दुनिया… ☆ श्रीशैल चौगुले ☆

चार पावलांनी दुनियाच संपते

वित्त, प्रतिष्ठा, सत्ता, अहंम, व्यापते.

*

शर्यतीत जीवन पुढेच पळते

सजीवाचे नियम पाळणे छळते.

*

ज्याची त्याची गती पुसून आता गेले

युगासवे धावणे हेची दैव झाले.

*

ज्याने-त्याने रमावे ऐश्वर्यात झोकी

स्वयं सोडला तर ओझे सर्व बाकी.

*

सन्मानाचा डौल विजयाची देतो ग्वाही

जिंकण्यासाठीच आयुष्य संपून जाई.

*

वर्णावे काय या कलियुगाचे क्रमण

क्षणात बदले काळचक्राचे भ्रमण.

*

थांबावे तर संकट, चालणे बिकट

जगणे थांबून राही, मरण निकट.

*

आकाशी हाताचा स्पर्श, कवेत सागर

रात्रंदिनात ना राहिले वेळ अंतर.

*

असत्य, हिंसा, अनिती, असूरीचे पाश

सत्य द्वापार-त्रेता, मात्र कलित-नाश.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दावण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ दावण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

बंद दाराआड चर्चा चाललेली ऐकतो

बोललो नाही कधीही आज थोडे बोलतो

*

संपला आतंक नाही खूप मेली माणसे

सोडला मी तोल नाही संयमाने सांगतो

*

तापल्या वाटा सुखाच्या सावल्या ही पेटल्या

शांततेने चालण्याला वाट साधी मागतो

*

हरवला विश्वास इथला प्रेम आहे गोठले

राजसत्ता चालवाया पण जिव्हाळा लागतो

*

कैद झाले देव सारे बंद झाली मंदिरे

बावळा झाला पुजारी नाचनंगा घालतो

*

कोंडुनी स्वातंत्र्य तुम्ही का गुलामी लादता

दडपणा खालीच सगळे आज आम्ही नांदतो

*

पारध्याच्या दावणीला लोक कोणी बांधले

कोण दाणे टाकतो तर कोण माना छाटतो

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तो” आणि आपण! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏 “तो” आणि आपण! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नाही त्यास वावडे

सोनेरी देव्हाऱ्याचे,

“तो” जाणतो खरे रंग

हृदयातील भक्तीचे!

 “तो” भाव भावाचा

 सदा असे भुकेला,

 भुलेल का “तो” अशा

 बेगडी देखाव्याला?

साध्या नमस्काराची

“तो” धरीतसे आस,

असे साऱ्या चराचरी

त्याचाच बघा वास!

 “तो” दिसतो सर्वांना

 वेगवेगळ्या रुपात,

 पण समजावया हवा

 भाव आपल्या मनांत!

सदा राहून सजग

वावरा या जगती,

पडेल अवचित गाठ

कळेल त्याची महती!

कळेल त्याची महती!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फूल म्हणू की भूल मना… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? फूल म्हणू की भूल मना… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

फूल म्हणू की भूल मना

दर्शने काही सुचेचना!

सूर्यकिरणी सौंदर्य नाहते

पाहते मी पुन्हा पुन्हा!

*
सौंदर्याला कणखर वेढा

नजाकतीने पडे भोवती!

सहजपणाने खडू नये

म्हणत असावी नियती!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆  कविता – ती चार दैवी मुले – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 ✒️ अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ✒️ 💐

तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांनी आयोजित केलेल्या दशकपुर्ती सोहळा काव्यलेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना त्यांच्या ‘तितिक्षा’ या रचनेसाठी सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार मिळाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐 💐

☘️. ☘️. ☘️. ☘️. ☘️

– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कार प्राप्त कविता – “ती चार दैवी मुले…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

पुरस्कार प्राप्त कविता

विषय – तितिक्षा 

? कवितेचा उत्सव ?

☆ ती चार दैवी मुले ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बालपणी हरवली,

छाया माथ्यावरची!

पोरकी झाली चौघे,

वाट धरी पैठणची!… १

*

ब्रम्ह वृंदास सामोरे,

प्रश्न केले अवघड!

शुध्दिपत्र मिळण्यास,

खूप केली धडपड!… २

*

ज्ञाना देई गुरूपद,

निवृत्तीस ते श्रध्देने!

चालले सोपान, मुक्ता,

मागुती त्यांच्या मायेने!.. ३

*

तितिक्षा सर्वास होती,

घेण्यास ज्ञान सखोल!

वृत्ती सर्वांच्याच होत्या,

तितिक्षेत समतोल!… ४

*

आकलन झाले सर्वां,

ही आहेत दैवी बाळे!

यांच्या अथांग ज्ञानात,

श्रीकृष्ण अंतरी खेळे!.. ५

*

जाणली त्यांची तितिक्षा,

योगेश्वराने अंतरी!

ज्ञानेश्वरी ही जन्मली,

या नेवाश्यात भूवरी!.. ६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares