मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीची कविता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीची कविता... ☆ श्रीशैल चौगुले ☆

जाता-जाता सहज लिहीता

शब्दासंगे होईल कविता

निळे आभाळ, हिरवी धरा

मनातली सरिता-सविता.

सहा ऋतूतले रत् भोळे

शब्द माझे मोहिती कोकिळे

रान पिकातून फुलपाखरे

भृंगर गुंजन काव्यांचे चाळे.

 *

प्रहर-प्रभाती भुपाळी सुचे

सोनेरी शब्दांचे ते भाव रचे

चिव-चिव पाखरेही अंगणी

चिंतन चटकन शब्द वेचे.

 *

अक्षर पिसारे फुलते स्पंदनी

हृदय सुखावे ओहोळ प्रवाही

अलगद उन्हात झुले सावली

वैशाखातही काव्य मोद ग्वाही.

 *

पाऊस हलका शब्दात खेळे

श्रावण येता कवितांचे मेळे

चंद्रात चांदणे शरद गाणे

हेमंती मग छंदातच लोळे.

 *

आता सांजवेळी उगी नजर

आठवणीसंगे शब्दा पाझर

सरते असेच कवितेचे वय

वड-पिंपळ काव्याला गोजिर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 चांगले लोकही आंधळे जाहले

फालतू वागले कावळे जाहलें

संगती भोवल्या नासल्या भावना

भोग भोगायचे सोहळे जाहले

 *

गुंतले ते असे लाभल्या यातना

जाणते शाहणे वेंधळे जाहले

 *

सापळे मांडले कोंडली माणसे

भक्त सारे कसे बावळे जाहले

 *

धर्म आहे कुठे राहिला चांगला

कर्म आहे इथे पांगळे जाहले

 *

साधना संपली वासना जागली

पाप ही हासले सोवळे जाहले

 *

बंधने संपली कायदे मोडले

गुंड आता पुन्हा मोकळे जाहले

 *

रंगल्या बातम्या संपली तीवृता

ढोंग आता किती कोवळे जाहले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनातले आभाळ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏 मनातले आभाळ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मनी दाटल्या आभाळाला

कधीतरी मोकळे करा,

डोह दुःखी आठवांचे

नित्य नेमाने रिते करा!

मनी दाटल्या आभाळाला

फिरू दे मुक्त आभाळी,

लादू नका तुमची घुसमट

तुम्ही त्याच्या कपाळी!

 *

मनी दाटल्या आभाळाला

नका घालू तुम्ही वेसण,

करून त्या मोकळे ढाकळे

करा साजरा रोज सण!

 *

मनी दाटल्या आभाळाला

भरू दे स्वतः आपले रंग,

कुवत त्याची जोखा तुम्ही

ते समर्थ रचण्या अभंग!

ते समर्थ रचण्या अभंग!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ यांची वेगळीच भाषा.. ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? यांची वेगळीच भाषा.. ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

या पिवळ्या रंगाची

बाई वेगळीच भाषा

सोनियाच्या रंगीरंगे

रोज उगवती दिशा!!

*

चाफा पिवळ्या रंगात

मंद गंधाळ बोलतो

रंग घेऊनी पिवळा

शेवंतीत विसावतो!!

*

पित गुलाबाची तऱ्हा 

आता कशी वर्णू बाई

करी मोकळी पाकळी

गंघ वारीयाला देई!!

*

मंद गंध या फुलांचा

चित्तवृत्तीला तजेला

या पिवळ्याचे कौतुक

पुरे करते आजला!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अवकाशाचे अंतटोक… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अवकाशाचे अंतटोक ☆ श्रीशैल चौगुले ☆

कवेत पर्वत घेण्या

मी पर्वत होऊन जावे

त्या स्वर्गधुक्यात न्हाता

आयुष्य हे निसर्ग व्हावे.

या शिव निलनभास

स्पर्शून निळकंठ व्हावे

विसरुन या विश्वाला

पंख घेऊन विहारावे.

हे हात रिकामे साथी

भासे कुठेतरी हा त्याग

हा जन्मसुखी सोहळा

या धरतीवर पुण्य राग.

हिमशिखराशी भाव

मन भक्तीमोही अतुल्य

एक शिवाची निर्मीती

मानवा पवित्र नि अमुल्य.

अमोद किरणे कोटी

देहास छेडती ही प्रभात

उभा असा साधू जैसा

ओंकार नादाचा प्रपात.

संपून हे माया कोष

अवकाशाचे अंत टोक

श्वासात अखंड वेद

सहा ऋतूंचे देव लोक.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खळाळ रक्ताचा… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

खळाळ रक्ताचा ☆ प्रा. भरत खैरकर 

स्वप्नांची ओढूनी शाल

पाषाणाशी घेतली उरभेट

माथ्यावरचे आभाळ धरण्या

चढलो घाटांवर घाट!

 *

अखंड वेदना पेलतांना

झुंजायाचे बळ आले

तुटल्या पंखानी भरारतांना

पंखाखाली आभाळ निळे!

 *

शमता खळाळ रक्ताचा

पेलताना चढावाचे आव्हान

अधांतरी अंतरीचा झुला

तुटे कंठातील मधुतान!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८९ – सुखी संसाराची छाया…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८९ – विजय साहित्य ?

☆ सुखी संसाराची छाया…!

(काव्यप्रकार : अष्टाक्षरी)

परंपरा संस्कृतीत,

नारीशक्ती आहे वसा.

कर्तृत्वाची पराकाष्ठा,

संयमाचा दैवी ठसा…! १

*

गाते भुपाळी अंगाई,

नारी दळते दळण.

घर स्वच्छता पहाटे,

जमा करी सरपण…!२

*

लागे जीवनाचा कस,

होई सासुरासी जाच.

कसे जगावे जीवन,

सांगे आठवांना वाच…!३

*

पिढ्या पिढ्या राबतसे,

घर संसारात नारी.

पती मानुनी ईश्वर,

घेई कर्तृत्व भरारी…!४

*

कष्ट,त्याग, समर्पण

नाते संबंधांचा सेतू.

नारीशक्ती कर्मफल,

घरे जोडण्याचा हेतू…!५

*

माती आणि आभाळाशी,

नारी राखते इमान.

संगोपन छत्रछाया,

नारीशक्ती अभिमान…!६

*

नारी कालची आजची,

जपे स्वाभिमानी कणा.

कष्ट साध्य जीवनाची,

नारी चैतन्य चेतना…! ७

*

बदलले जरी रूप,

नाही  बदलली नारी.

अधिकार कर्तव्याची,

करे विश्वासाने वारी…!८

*

नारी आजची साक्षर,

करी कुटुंब‌ विचार.

सुख ,शांती, समाधान,

करी ऐश्वर्य साकार…!९

*

नर आणि नारी यांचा,

नारीशक्ती आहे बंध.

जाणिवांचा नेणिवांशी,

दरवळे भावगंध…!१०

*

देई कुटुंबास स्थैर्य,

नारीशक्ती प्रतिबिंब.

रवि तेज जागृतीचे,

जणू एक रविबिंब..! ११

*

नारी संसार सारथी,

नारी निजधामी पाया.

तिची कार्यशक्ती आहे,

सुखी संसाराची छाया…!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मधुगंध…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “मधुगंध...” ☆ सौ राधिका भांडारकर 

गंध मधुवनी प्राजक्ताचा दरवळतो

हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।ध्रु।

शीत गुलाबी थंडी भिडते अंगाला

सख्या साजणा आतुरले त्या स्पर्शाला

अवचित पानी मधाळ वारा झुळझुळतो

हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।१।

 *

पानगळीचा ऋतू हा दिसे नारंगी

साज धरेच्या शृंगाराचा बहुरंगी

तो वनीवनी सुमनी भुंगा गुणगुणतो

हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।२।

 *

शाल धुक्याची हळूच सृष्टी पांघरते

दवात भिजता प्रणय भावना जाणवते

यमुना काठी नाद पैंजणी घुमघुमतो

हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।३।

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९, radhikabhandarkar@yahoo.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांज… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सांज… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

दूर क्षितिज रेघेशी

मेघ व्याकूळ उदास

रंगबिरंगी जगाची

लागे काजळू आरास

*

आणि इथेही अंतरी

लागे थरथरू दीप

होऊ पाहे चैतन्याचे

एक जडशीळ शिल्प

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गौरीफुले उमलली… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गौरीफुले उमलली… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या चौदा, यती आठव्या अक्षरावर)

(भावगीत)

घन धुंद कुंद झाला त्या सावळ्या सुखाने

गौरीफुले उमलली आषाढ पावसाने ||ध्रु||

*

बहु गोड रंग त्यांचे नाजूक पाकळ्यांचे 

कधी जांभळे सुखावे रंगात रंग त्यांचे

फुलवंती पंचरंगी ती कातऱ्यांची पाने

गौरीफुले उमलली आषाढ पावसाने ||१||

*

येता सुसाट वारा, वा पावसाची धारा 

तनु याची कोमलांगी कोमेजतोय सारा

नाजूक नार भासे गुलमेंदीच्या रूपाने 

गौरीफुले उमलली आषाढ पावसाने ||२||

*

किती रंग देखणेसे वाहून श्री गणेशा 

अन् तेरडा सुखावे गौरींसवे हमेशा

शंकरपार्वतीसह ही लाभलीत नामे

गौरीफुले उमलली आषाढ पावसाने ||३||

*

कधी जांभळी गुलाबी स्वर्णीम नी कुसुंबी

दवबिंदू येऊनिया त्या पाकळीस चुंबी

मम् गीत ओठी आले त्या रूप लाघवाने

गौरीफुले उमलली आषाढ पावसाने ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares