कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९९ – विजय साहित्य ?

☆ मेघ बरसले…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(वृत्त – अनलज्वाला)

(मात्रा विभाग : ८-८-८ = २४  ( | प | प | प | )

मेघ निघाले,रजा घेउनी,

धरतीवरती

सोसाट्याचा वादळ वारा

अवती भवती .

 

सरी बरसल्या, उन्हात न्हाल्या,

हलके हलके

श्रावण धारा, तना बिलगल्या,

लटके लटके.

 

गंध शिवारी, ‌पेरत वारा,

वर्षा आली

तहानलेली, चिमण पाखरे,  तृप्त जाहली.

 

बहुरुपी जणू ,मेघ जाहले,  प्रकार नाना

येता येता,प्रत्येकाच्या, झुकल्या माना.

 

सर मायेची ,रमवी रिझवी, चरा चराला,‌

कृष्ण घनांची,तहान लागे,  घरा घराला.

 

रवि किरणांची, लपाछपी ही,

बघतो कोणी

रिता खजिना, त्या वरुणाचा,

भरल्या गोणी.

 

हिरव्या पानी, वाजत गाजत,

मेघ उतरले

सर सर झप झप, पावसात या,

मेघ बरसले.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted