श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 86 ☆

☆ सुत्तरफेणी ☆

डोक्यावरची सुत्तरफेणी नात चिवडते

हातामधला गंध गोडवा मस्त पसरते

 

कधी न कुणाच्या समोर झुकला माझा ताठा

समोर ती मग अहमपणा हा होतो थोठा

हातात घेऊन चाबूक माझा घोडा करते

 

दडून बसते हळूच घेते चष्मा काढून

शोधा म्हणते बोलत असते सोफ्या आडून

चष्मा नसता डोळ्यांना या चुळबूळ दिसते

 

घरात माझ्या स्वर्गच आहे अवतललेला

ओठांमधुनी अमृत झरते ना मधूशाला

नातिन माझी परी कथेतील परी वाटते

 

कधी भासते गुलाब ती, कधी वाटते चाफा

गंध फसरते कधीच नाही डागत तोफा

अंश ईश्वरी तिच्यात दिसतो जेव्हा हसते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments