गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ अधिक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
खरं तर अधिक महिना म्हणजे पंचांग, कालमापनामधे येत असलेला फरक काढून कालगणना सुरळीत व्हावी यासाठी केलेली सोय आहे.
पण आपण आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करत असतो,
थोडक्यात काय तर इंग्रजी कॅलेंडर मधे लीप वर्ष येते अगदी तसंच.
याला अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि बोली भाषेत धोंडयाचा महिना असं म्हणलं जातं.
या निमित्ताने बरीच व्रत वैकल्ये, जप, तप, वाचन, मनन, नामस्मरण आणि दान यांचे खूप महत्त्व आहे.
या मधे मला काही गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.
– – चांगल्या सवयी, विचार नेहमीच प्रेरणादायी असतात.
अधिकात करूया 33 सकारांची जोपासना…
सध्या चालू असलेला अधिकमास म्हणजे दानधर्म, व्रतवैकल्ये करुन पुण्यसंचय करायची सुवर्णसंधीच.
अधिक मासात 33 संख्येला विशेष महत्त्व.
दान करायच्या वस्तू 33 या संख्येने – – या दानालाच 33 सकारांची जोड मिळाली तर !
कोणते हे ३३ सकार? बघूया…
१) सदाचार २) सद्भावना ३) समयसूचकता ४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता ७) सहजता (वागण्या – बोलण्यातील) ८) सौजन्य ९) स्नेहभाव १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान १२) सौम्यपणा १३) सुदृढता (शरीर व मनाची) १४) सत्यवादित्व १५) संकल्प १६) संयम १७ स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती २०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टि २३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषतः आपल्या क्षेत्रातील) २५) सरसत्व २६) सातत्य २७) समाधान २८) स्वावलंबन २९) सजगता (सावध राहणे) ३०) सुसंस्कार ३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुंसेवा
हे ३३ सकार आत्मसात करायचे या अधिकमासाच्या निमित्ताने ठरविले तर आयुष्य नक्कीच सफल, सुकर, समृद्ध सुखी होईल. आपण खरोखरच सधन होऊ नाही का?
(पुन्हा ‘स’ आहेच)
… सत्यम् शिवम् सुंदरम् ची अनुभूती यायला वेळ लागणार नाही.
… मात्र हे सकार आत्मसात करायला सकारात्मकता हवी हे निश्चित.
प्रयत्न करायला काय हरकत आहे?…
अधिकस्य अधिकं फलम्
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





