स्वाती विकास गाडेकर
कवितेचा उत्सव
☆ आपली मुंबई... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆
☆
ही मुंबई, आम्हा सर्वांच्या जीवाभावाची..
सगे-सोयरे मित्र परिवार, सर्वांच्याच लाडाची!!
*
मुंबई आजची, आणिक कालची..
तशी वेगळी, पण सर्वांच्याच प्रेमाची!!
*
राजी खुशीने, नांदती सखेसाबती..
जीवाला जीव देणे, हीच मुंबईकरांची ख्याती!!
*
नाही झोपत मुंबई कधीही..
अशी महती असे, जगात अत्रतत्र सर्वत्रही!!
*
राहती खोपट्यात-झोपडीत आनंदाने..
तशीच राहती, बिल्डिंग अन् बंगल्यात सुखाने!!
*
समुद्र असे, तिची अस्सल शान..
ट्रॅफिक जॅम चा, मुंबईकर सदा गुलाम!!
*
लोकल ट्रेन, असे तिची जीवनवाहिनी..
सदा तत्पर असे, सर्वांसाठी मान उंचाऊनी!!
*
सजलेली ही मायानगरी नटनट्यांनी..
आर्थिक उद्योगाची, नावाजलेली राजधानी!!
*
इतका मुंबईचा पसारा मोठा..
चारही टोके कुणीही सहज गाठा!!
☆
© स्वाती विकास गाडेकर
ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ मो ९८३३७००५७१
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





