श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे… सत्य साचे सारे.. – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
सत्य साचे खरे / नाम विठोबाचे बरे//१//
येते तुटती बंधने / उभय लोके कीर्ती जेणे // २//
भाव ज्याचे गाठी / त्यास लाभ उठाउठी //३//
तुका म्हणे भोळा / जिंकू जाणे कळिकाळा // ४//
– संत तुकाराम.
*
आपल्या मुखाने विठोबाचे नाव सतत घेणे हेच खरे सत्य आहे. त्यामुळे आपल्यावर लादली गेलेली कोणतीही बंधने उरत नाहीत. ज्याच्या मनी भक्तीभाव आहे त्याला सर्व गोष्टींचा अगदी सहजासहजी लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात साधाभोळा असणारा माणूस कळिकाळालाही त्यामुळे जिंकू शकतो.
देवाचे नामस्मरण हे जगातले एकमेव सत्य आहे. व्यक्तीला एकदा का त्याची गोडी लागली की इतर कोणतीही बंधने त्या व्यक्तीला बांधू शकत नाहीत. असा माणूस लौकिक सुखदुःखात गुंतून पडत नाही. त्यामुळे सगळीकडे आपोआपच त्याची चांगली कीर्ती पसरू लागते. त्यांचे जगणे समृध्द झाल्याचा अनुभव येतो. त्याला कुठलीच उणीव भासत नाही. असा माणूस दिसायला साधाभोळा दिसतो पण त्याच्याकडे कळिकाळालाही जिंकण्याचे सामर्थ्य असते. ते सामर्थ्य पुढे येवढे वाढते की तो प्रत्यक्ष यमधर्मावरही विजय मिळवतो. त्याला कधीच मृत्यूचे भय वाटत नाही.
तुका म्हणे
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







