श्रीशैल चौगुले
चित्रकाव्य
☆ गावाकाठचा ओढा – श्रीमंतांचा घोडा... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
शहरी नाट्य ओढ्याला गिळत आहेत
श्रीमंत नेते गावाला गिळत आहेत.
*
हिमतीचा शिवाजी सत्तापिसाट आहे
धोरणीबाज राक्षसा अहंः अचाट आहे.
*
सारा स्वाभिमान पुढार्यांस गहाण आहे
जाणीवपूर्वक छळणारा महान आहे.
*
भुकंप-सुनामी कोप कळतोच कुणा येथे
माणसाची व्याख्या लाचखोरीत बेभान आहे.
*
अधिकारी नेते चंगळ अतिरेकात आहे
धमकी दादागिरीत गांधीवाद शांत आहे.
*
ज्याला त्याला अमिषाची चाड निती ज्ञात आहे
गाव संपताना नथुराम आरामात आहे.
*
देशाचा विसर, विदेशवादात दंग आहे
नव्या पिढीचे कारण चार्वाकाचा ढंग आहे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




