श्री ब्रह्मानंद पै
वाचताना वेचलेले
☆ ‘निवृत्तीची मजा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆
☆
काही वर्षांपासून घरीच असल्यामुळे आता मला अशा काही गोष्टी कळल्या आहेत, ज्या नोकरीत असताना कधी लक्षातही आल्या नसत्या…
आपल्या गॅसच्या मोठ्या बर्नरला १०६ छिद्रे, तर छोट्या बर्नरला ८६ छिद्रे असतात.
एका Marie Biscuit मध्ये तब्बल २२ बारीक छिद्रे असतात.
पंखा स्पीड ५ वर बंद केला, तर तो पूर्णपणे थांबायला १ मिनिट १२ सेकंद लागतात.
डास मारण्याच्या इलेक्ट्रिक रॅकेटमध्ये तब्बल ४८५ चौकोन असतात.
माचिसच्या एका पेटीत ४७ काड्या असतात… आत्ताच मोजून खात्री केली!
पेटीवर मात्र ५० काड्या असे लिहिलेले असते.
Balaji Wafers च्या ५ रुपयांच्या पाकिटात १४ वेफर्स, तर १० रुपयांच्या पाकिटात २४ वेफर्स असतात.
म्हणजे ५ रुपयांची दोन पाकिटे घेतली, तर २८ वेफर्स मिळतात आणि १० रुपयांच्या एका पाकिटात फक्त २४! म्हणून नेहमी ५ रुपयांचीच दोन पाकिटे घ्या!
माझे संशोधन अजूनही सुरूच आहे…
नवीन शोध लागले की तुम्हाला नक्की कळवत राहीन!
मित्रांनो, तुम्हीही तुमच्या निवांत वेळेत लावलेले असे काही भन्नाट शोध नक्की शेअर करा.
शेवटी काय, निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो… फक्त तो घालवण्यासाठी असे उद्योग शोधावे लागतात!
अशा छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करण्यातही किती मजा आहे ना!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




