डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ ॥ अथ देवीस्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆ ☆ ☆ ☆
।। अथ देवीस्तोत्रम् ।।
श्री भगवानुवाच:
नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नम: ।
कल्याण्यै कामदायै च वृद्धयै सिद्धयै नमो नम: ।।१॥
*
सच्चिदानन्दरूपिण्यै संसारारणयै नम: ।
सच्चिदानंदरूपी भवसागरतारिणी नमन ।।२॥
*
सर्वाधिष्ठानरूपायै कूटस्थायै नमो नम: ।
अर्धमात्रार्थभूतायै हृल्लेखायै नमो नम: ।।३॥
*
ज्ञातं मयाsखिलमिदं त्वयि सन्निविष्टं ।
त्वत्तोsस्य सम्भवलयावपि मातरद्य ।
शक्तिश्च तेsस्य करणे विततप्रभावा ।
ज्ञाताsधुना सकललोकमयीति नूनम् ।।४॥
*
विस्तार्य सर्वमखिलं सदसद्विकारं ।
सन्दर्शयस्यविकलं पुरुषाय काले ।
तत्त्वैश्च षोडशभिरेव च सप्तभिश्च ।
भासीन्द्रजालमिव न: किल रंजनाय ।।५॥
*
न त्वामृते किमपि वस्तुगतं विभाति ।
व्याप्यैव सर्वमखिलं त्वमवस्थिताsसि ।
शक्तिं विना व्यवहृतो पुरुषोsप्यशक्तो ।
बम्भण्यते जननि बुद्धिमता जनेन ।।६॥
*
प्रीणासि विश्वमखिलं सततं प्रभावै: ।
स्वैस्तेजसा च सकलं प्रकटीकरोषि ।
अस्त्येव देवि तरसा किल कल्पकाले ।
को वेद देवि चरितं तव वैभवस्य ।।७॥
*
त्राता वयं जननि ते मधुकैटभाभ्यां ।
लोकाश्च ते सुवितता: खलु दर्शिता वै ।
नीता: सुखस्य भवने परमां च कोटिं ।
यद्दर्शनं तव भवानि महाप्रभावम् ।।८॥
*
नाहं भवो न च विरिञ्चि विवेद मात: ।
कोsन्यो हि वेत्ति चरितं तव दुर्विभाव्यम् ।
कानीह सन्ति भुवनानि महाप्रभावे ।
ह्यस्मिन्भवानि रचिते रचनाकलापे ।।९॥
*
अस्माभिरत्र भुवे हरिरन्य एव ।
दृष्ट: शिव: कमलज: प्रथितप्रभाव: ।
अन्येषु देवि भुवनेषु न सन्ति किं ते ।
किं विद्य देवि विततं तव सुप्रभावम् ।।१०॥
*
याचेsम्ब तेsड़्घ्रिकमलं प्रणिपत्य कामं ।
चित्ते सदा वसतु रूपमिदं तवैतत् ।
नामापि वक्त्रकुहरे सततं तवैव ।
संदर्शनं तव पदाम्बुजयो: सदैव ।।११॥
*
भृत्योsयमस्ति सततं मयि भावनीयं ।
त्वां स्वामिनीति मनसा ननु चिन्तयामि ।
एषाssवयोरविरता किल देवि भूया- ।
द्वयाप्ति: सदैव जननीसुतयोरिवार्ये ।।१२॥
*
त्वं वेत्सि सर्वमखिलं भुवनप्रपंचं ।
सर्वज्ञता परिसमाप्तिनितान्तभूमि: ।
किं पामरेण जगदम्ब निवेदनीयं ।
यद्युक्तमाचर भवानि तवेंगितं स्यात् ।।१३॥
*
ब्रह्मा सृजत्यवति विष्णुरुमापतिश्च ।
संहारकारक इयं तु जने प्रसिद्धि: ।
किं सत्यमेतदपि देवि तवेच्छया वै ।
कर्तुं क्षमा वयमजे तव शक्तियुक्ता: ।।१४॥
*
धात्री धराधरसुते न जगद् बिभर्ति ।
आधारशक्तिरखिलं तव वै बिभर्ति ।
सूर्योsपि भाति वरदे प्रभया युतस्ते ।
त्वं सर्वमेतदखिलं विरजा विभासि ।।१५॥
*
ब्रह्माsहमीश्वरवर: किल ते प्रभावा-।
त्सर्वे वयं जनियुता न यदा तु नित्या: ।
केsन्ये सुरा: शतमखप्रमुखाश्च नित्या ।
नित्या त्वमेव जननी प्रकृति: पुराणा ।।१६॥
*
त्वं चेद्भवानि दयसे पुरुषं पुराणं ।
जानेsहमद्य तव सन्निधिग: सदैव ।
नोचेदहं विभुरनादिरनीह ईशो ।
विश्वात्मधीरति तम:प्रक्रति: सदैव ।।१७॥
*
विद्या त्वमेव ननु बुद्धिमतां नराणां ।
शक्तिस्त्वमेव किल शक्तिमतां सदैव ।
त्वं कीर्तिकान्तिकमलामलतुष्टिरूपा ।
मुक्तिप्रदा विरतिरेव मनुष्यलोके ।।१८॥
*
गायत्र्यसि प्रथमवेदकला त्वमेव ।
स्वाहा स्वधा भगवती सगुणार्धमात्रा ।
आम्नाय एव विहितो निगमो भवत्या ।
संजीवनाय सततं सुरपूर्वजानाम् ।।१९॥
*
मोक्षार्थमेव रचयस्यखिलं प्रपंचं ।
तेषां गता: खलु यतो ननु जीवभाम् ।
अंशा अनादिनिधनस्य किलानघस्य ।
पूर्णार्णवस्य वितता हि यथा तरंगा: ।।२०॥
*
जीवो यदा तु परिवेत्ति तवैव कृत्यं ।
त्वं संहरस्यखिलमेतदिति प्रसिद्धम् ।
नाट्यं नटेन रचितं वितथेsन्तरंगे ।
कार्ये कृते विरमसे प्रथितप्रभावा ।।२१॥
*
त्राता त्वमेव मम मोहमयाद्भवाब्धे- ।
स्त्वामम्बिके सततमेमि महार्तिदे च ।
रागादिभिर्विरचिते वितथे किलान्ते ।
मामेव पाहि बहुदु:खकरे च काले ।।२२॥
*
नमो देवि महाविद्ये नमामि चरणौ तव ।
सदा ज्ञानप्रकाशं मे देहि सर्वार्थदे शिवे ।।२३॥
*
।। इति श्रीमद्देवीभागवते महापुराणे तृतीयस्कन्धे विष्णुना कृतं देवीस्तोत्रं ।।
☆
☆ मराठी भावानुवाद ☆
*
कथित श्रीभगवान
विधात्री देवी प्रकृतीला माझे सदैव नमन
कामना शुभदायिनी वृद्धी-सिद्धीदात्री नमन ॥१॥
*
सच्चिदानंदरूपी संसारार्णवतारिणी नमन
सच्चिदानंदरूपी भवसागरतारिणी नमन ॥२॥
*
सकलाधिष्ठानरूपिणी अविकारी नमन
अर्धमात्रास्थ हृदये लिखित नमो नमन ॥३॥
*
ज्ञात मला संचार तुझा स्वैर समस्त जगती
विश्वाच्या माते तूच उत्पत्ती लय तथा स्थिती
विश्वरचनेची अतिप्रभावी महान तव शक्ती
तव कारणे विश्व ज्ञात सर्वलोके तव व्याप्ती ॥४॥
*
सदसद्विकारे विस्तारिले तू या जगतासी
अविकल दर्शन देशी कालासंगे पुरुषासी
षोडश तत्वे सप्तविकारे प्रतीत तव शक्ती
चंद्र चांदणे इंद्रजालसम रंजवीते तव शक्ती ॥५॥
*
तुझ्याविना साक्षात न होई काही जगतात
तव शक्तीने व्यापियलेले समस्त हे जगत
शक्तिविना तव शक्तीहीन पुरुषकार्य व्यर्थ
मेधावी पंडीत करिती स्तवन तुझे सार्थ ॥६॥
*
अपुल्या प्रभावे जगता सदैव प्रसन्नता देशी
अपुल्या तेजे समस्त जगता तूचि प्रकट करीशी
कल्पकालेही तव शक्ती अविचल शाश्वत नित्य
तव वैभव चरित देवी कोण्या वेदा नाही ज्ञात ॥७॥
*
संरक्षिलेस आम्हा मधुकैटभासुरांपासुन
सक्षम केले सकलांसी तव कृपेचे दर्पण
सुखानुभूती अनुभुती माते परम कोटी देशी
दर्शन देउन महाप्रभावी भवानी धन्य करिशी ॥८॥
*
मी न ब्रह्मा विष्णु महेश मी तव केवळ पुत्र
कोणा न ज्ञात तव अगाध अनाकलनीय चरित्र
महाप्रभावे तव त्रिभुवनांचे अस्तित्व जागृत
भवानी देवी सृष्टी ही तू कलात्मकतेने रचित ॥९॥
*
हरीविना अमुचा कोणी रक्षणकर्ता नाही अन्य
महिमा तव कीर्ति ब्रह्माची थोर झाले शिवदर्शन
तुझ्यासारखे गुण हे देवी नाही दुजा कोणात
थोरवी तुझी कोणी ना जाणे मतीच्याही अतीत ॥१०॥
*
मनोकामना पूर्ण करावी तव चरणी नमन
तव रूपाचा वास असावा धन्य होउ दे मन
अखंड हृद्गुंफेतुनिया मम असो नाम वास
सदैव दर्शन तव चरणांचे हीच मनी आंस ॥११॥
*
सेवक मी तर तुझाच असु दे मनी तुझी भक्ती
तूच स्वामिनी तुझेच केवळ स्मरण माझिया चित्ती
तुझे जागरण अंतर्यामी माझ्या हेचि नित्य कर्म
पुत्र तुझा मी मातपिता सेवा हाच असो धर्म ॥१२॥
*
संसारातील प्रपंच सारा तुला पूर्ण ज्ञात
असीम सर्वज्ञता तुझी गे तुझे ज्ञान अनंत
म्या पामरे श्रीजगन्माते काय तुला मागावे
पालन तव आज्ञेचे करिता जीवन मंगल व्हावे॥१३॥
*
ब्रह्मा उत्पत्ती विष्णु स्थिती उमापती विनाशक
समस्त जगताला ज्ञात तव शक्ती संहारक
तव इच्छेनेच होते नियंत्रण अखिल जगताचे
सक्षम आम्ही सामर्थ्य अम्हा वरदान तुझ्या कृपेचे ॥१४॥
*
धराधरसुते धारण करिशी समस्त जगताला
तव शक्ती अखिल जगता आधार धारण्याला
तव शक्तीने भास्कराची प्रभा उजळते जगताला
तव शक्तीवर अवलंबुन विश्व प्रकाशित व्हायाला ॥१५॥
*
विरंची नारायण महादेव तुझिया अंकित असती
समस्त जीव तुझीच सृष्टी तूच राखिशी स्थिती
देवेंद्र देवता असुरांना नित्य राखिते तव शक्ती
तुझ्या कारणे हे जननी प्राचीन जाहली सृष्टी ॥१६॥
*
करुणेने तव प्राचीनत्व प्राप्त होतसे पुरुषाला
अस्तित्व तुझे माझ्या ठायी तव सन्निध मी ज्ञात मला
कृपेविना तव ईशा अनंत विभु ना निरंकार ना मी
तुझ्या प्रभावे अज्ञाना हटवुन विश्वात्म्या जाणितो मी ॥१७॥
*
बुद्धिवंत मानवास कृपेने तुझ्या प्राप्त विद्या ज्ञान
बलवंतांना तुझ्या प्रभावे प्राप्त होई शक्तीचे दान
कीर्ति कांती निर्मल तुझी रूप तसेच तुष्टी
तुझ्या कृपेने वैराग्याने मनुष्यलोकातुन मुक्ती ॥१८॥
*
वेदांची प्रथम कला गायत्री मंत्र तूच असशी
स्वाहा तूचि स्वधा तूचि सगुण अर्धमात्राअसशी
निर्धारित वेदार्थ प्रकटला तुझियाची प्रभावे
पूर्वजांना देवतांना संजीवन प्राप्त तुझ्या प्रभावे ॥१९॥
*
रचिलीस अखिल सृष्टी मोक्ष व्हावा सर्वा प्राप्त
जीवनयात्रेचा प्रारंभ जेथ तेथे तव ऊर्जेचा स्रोत
ऊर्जा तव अंश ब्रह्माचा पावन अनादि अनंत
सागर लाटांसम व्याप्ती तव ऊर्जेची विश्वात ॥२०॥
*
जीवा लाभता तव सामर्थ्य जीवनाचे कर्म
सकला ज्ञात तव शक्तीने सृष्टीसंहार तव वर्म
सृष्टीनाट्य रचियले नटाने अंतरंगे भावव्यथित
विराम प्रभावा पूर्ती होता कार्याची विहित ॥२१॥
*
मोहार्णवात जीवनाच्या या तुझाच तारक हात
शरण तुला मी अंबिके जीवनक्लेश तू निवारत
तुझ्यामुळेच शांती रागद्वेषादि विकारी मनास
दुःखकारी जीवनी अमुचे तूचि रक्षण करावेस ॥२२॥
*
नमन देवी महाविद्ये तव चरणांसी अर्पण नमन
शिवे सकलार्थदे सर्वदा ज्ञानप्रकाश करी प्रदान ॥२३॥
*
।। इति श्रीमद्देवीभागवते महापुराणे तृतीयस्कन्धे विष्णु कृत निशिकान्त भावानुवादित देवीस्तोत्रं संपूर्ण।।
☆ ☆ ☆ ☆
मराठी भावानुवाद © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





