श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 🙏 रोज करा सण साजरा! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
आता या वयात रोज
सण करायचा साजरा,
दर्शन घेऊन नारायणाचे
मनांत करायचा मुजरा !
*
आता या वयात रोज
काहीतरी वाचायचे,
जमल्यास एखादं पान
आपले विचार लिहायचे !
*
आता या वयात रोज
वर्तमानात जगायचे,
बरे वाईट होऊन गेले
भूतकाळातच ठेवायचे !
*
आता या वयात रोज
गप्पांचे फड जमवायचे,
मित्र मैत्रिणी जमवून
खळखळून हसायचे !
*
आता या वयात रोज
मनसोक्त फिरायचे,
झेपणार नाही म्हणतं
कुढत नाही बसायचे !
*
पटलं असेल तुम्हाला
तर करा चेहरा हसरा,
रोज करा सण साजरा
रोज करा सण साजरा
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





