सुश्री सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ क्षण… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

क्षण जातात हळूच सरकून

वाऱ्याच्या झुळुकीसारखे,

पण मनात राहतात ठसे

अपूर्ण स्पर्शासारखे..

*

आठवणींना ऊर्जा देते

तिन्हीसांजेची कातरवेळ,

मन उधाण वाऱ्याचे

अदृश्य थेंबाचा चाले खेळ..

*

सांजवेळी मग दूर क्षितिजावर

रंग केशरी अलगद विरून जाई,

डोळ्यांत तरळते एक आसू

ज्याला शब्दांची साथ न मिळे काही.

*

एकांताची साथ सोबत घेऊन

पुन्हा सुरू होतो मनाचा प्रवास,

प्रत्येक श्वासात आहे आठवण

ज्याला नाही कधी पूर्णविराम खास.

*

पुन्हा कधीतरी भेट होईल

या एकाच आशेवर आयुष्य चालते,

हरवलेल्या क्षणांची कहाणी

अशीच रोज मनात गुंफली जाते…

 सुश्री सुरेखा चिखलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments