श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वादळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
असणे नसणे यांच्या मधले अंतर कळते आहे
मानवतेचे या निकशावर नाते झुलते आहे
*
कोण कोठला कुठून आला याची पर्वा नाही
खला सोबती खल होताना सगळे जमते आहे
*
तो पैशाला देव मानतो चुकते कोठे त्याचे
गोळाकरण्या धनदौलत मग नाते तुटते आहे
*
अधिकारानी गळा घोटला स्वातंत्र्याचा येथे
न्यायदेवता डोळे झाकत मौनी बनते आहे
*
भ्रष्टाचारी जमले येथे करती सारे घपले
त्याच मुळे तर सामान्यांचे जगणे मरते आहे
*
भले पुढारी झाले त्यांना का हे दिसले नाही
दुर्बलतेचे रोज कलेवर येथे जळते आहे
*
खाणारानी खात जायजे दिसेल जे जे ते ते
सत्तेच्या मग बुरख्यात खाली सारे खपते आहे
*
समोर दिसतो विनाशकारी काळ मातला वेडा
रुपात त्याच्या विध्वंसाचे वादळ फिरते आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





