श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
☆ नावातच सगळं आहे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
टेंभा मिरवायला मराठीचा
आहे कार्यक्रमांचा सुकाळ,
पण समारंभाला नांव देतांना
पडे मराठी शब्दांचा दुष्काळ!
*
आंग्ल भाषेचा आधार घेतला
तरच म्हणे हल्ली मराठी कळतं,
मग अशा समारंभाना उगाच
मिरवणाऱ्यांच पाऊल वळतं!
*
जुने जाणते खरे अभ्यासक
वंचित राहतात अशावेळी,
प्रयोजकांपुढे आयोजकांची
बसते चांगलीच दातखिळी!
*
LIT FESTला मराठी प्रतिशब्द
शोधायला घ्या एखादी कॉन्टेस्ट,
जर नाहीच मिळाला कुठे तो
करा साजरी “अभिजात LIT FEST”
करा साजरी “अभिजात LIT FEST”
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






