सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ शब्द मनीचे… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
मन दुखावले,
शब्द मूक झाले!
ओलावले डोळे,
संवाद न बोले!
*
अंतरात भाव,
निखळ प्रेमाचा!
शब्द शब्द माझा,
असे हृदयीचा!
*
नसे वाट सोपी,
खाच खळग्यांची!
कशी पार करू,
वेस विचारांची!
*
भाव भावनेचा,
खेळ निरंतर!
चालला मनात,
जीवनी दुस्तर!
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






उज्ज्वलाताई छान आहे कविता.