प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ममतेचा फास… ☆ प्रा. भरत खैरकर 

आनंदवारा शिडात भरुनी

नावा निघाल्या पैलतिरी

अस्तित्वाचा शोध घेण्या

हिंदोळे मन लाटांवरी!

*

काजळ गर्द तमी

दिसता दीप दुरात

आशेची पैंजणे बनुनी

नाचती उरात!

*

भिरभिरणारी नजर शोधे

मायाळू थारा

कधी काळच्या दबलेल्या सुरांना

छेडतसे वारा

*

अधांतरी भवितव्याला

आधार किनारी वेस

दिगंतरीच्या पाखराला

ममतेचा फास!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments