सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ रोज डे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

निवडून आणलेला लाल गुलाब, कोमेजून गेला

दिवसभर बघून बघून, शेवट फोन ही ऑफ झाला…

*

किती प्रॅक्टिस केली होती, मनातलं सांगण्याची,

वर्षभर वाट पहात होता, याच एका दिवसाची…

*

नेहमीच्या तिच्या वाटेवर, तरीही तो उभा होता

तिच्या त्या पाउलांच्या खुणा, शोधत तो फिरत होता…

*

शेवटी ती येताना दिसली, अन् जीव सुखावला,

किंचितसे हसली, अन् मनात मोगरा फुलला…

*

तिने गुलाब घेतला, व खूप खूप प्रेमाचे बोलली

अन् मनावर दगड ठेऊन, शपथ घालून बसली…

*

रोज डे च्या दिवशीच, नवीन नातं सांगून गेली

पण रक्षाबंधनाचं आमंत्रण, हक्काने देऊन गेली…

*

जिवाचं दुखणं झाल्याने, तो आज खूप शांत आहे.

सांभाळून घ्यारे दोस्तांनो, हा आपलाच ‘प्रशांत’ आहे…

*

रोज डे च्या अनुभवाने, सांत्वनासाठी जाणे व्यर्थ आहे

कारण व्हॅलेंटाईन डे च्या, तयारीलाही तो आता लागला आहे…

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments