सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३०८
☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
माझ्याच माणसांनी केलाय डाव सारा
मी एकटीच आहे त्यांचा जमाव सारा
*
नाही..नको मला ते साम्राज्य स्थापितांचे
माझा मला असू दे हा सान गाव सारा
*
आहेत या इथेही मोकाट बैल काही
गोठ्यात माणसांचा आता निभाव सारा
*
मी कोंडले स्वतःला देवालयात तेव्हा
देवास वाटले की त्याचा प्रभाव सारा
*
कल्लोळ अंतरीचा आहे तसाच आहे
केला जगावयाचा आता सराव सारा
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





