शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ऑनलाइनची कळ…! ☆ शीला पतकी 

संदेश आम्हाला हल्ली एकच आवडतो 

पेन्शन जमा झाली की बँकवाला बोलवतो 

लेकापेक्षा बँकवाला जवळचा वाटतो

 वर्षातून एकदा तरी जिवंत आहे का विचारतो

*
अरे बँकेत जायच्या दिवशी काय रुबाब असतो

उरलेल्या चार केसाला कंगवा हळुवार लागतो 

खुंटीवरचा कोट सुद्धा आरशात पाहून हसतो

आणि उत्तराचा फाया मग कानात जाऊन बसतो

*

खुंटीला टांगलेला कोटाला सुद्धा कळतं

आज दिवस खास आहे 

उजव्या खिशात आज नक्की

 लक्ष्मीचा वास आहे

*

बँकेच्या दारातला दारवान कडकसॅल्यूट मारतो

सीनियर सिटीजन म्हणून मॅनेजर केबिनमध्ये बोलावतो

काउंटर वर पैसे देताना पोरगी गोड हसते 

सासरला गेलेली लेक मग तिच्यातच दिसते

*

सारे मित्र जमून कॅन्टीन मध्येच गुंगतो भजी आणि चहा सोबत गप्पांचा फड रंगतो

महिनाभरात रक्तात वाढलेला गोडवा विरलेले केस…

 एक एक गडी आऊट झालेलं तोंडांचे मैदान…

साऱ्या चिंतांची बाजूला पडते मोळी

आणि अर्धी तरी कमी होते बीपीची गोळी

*

घरी जाताना डाव्या खिशातला मोगरा हलकेच दरवळतो

 त्याचा सुगंध मात्र फक्त हिलाच कळतो

*

पोरगा म्हणतो बाबा कशाला उगीच तडतड

ऑनलाइन करा ना सगळं, उगाच का वडवड?

याला कोण सांगणार ऑफलाइन ची मजा

संवादाच्या मुसक्या बांधायची याना देवानेच दिलीय सजा 

*

बँकेत जाऊन काढलेल्या हजाराला लाखाचं बळ आहे

लेकाच्या पोटात उगाच ऑनलाईनची कळ आहे

बँकेतून पेन्शन काढण्याच्या लाईनीत ही मजा मिळवून देणाऱ्या सर्व बँक कर्मचाऱ्यांना समर्पित

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments