सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ संस्काराची ऊब … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
जोवर झाडावरती तोवर
आंबा असे कच्चा हिरवा
संस्काराची ऊब अढीची
हिरव्याचा तो होई भगवा !!
*
परंतु अढीत येण्यासाठी
परिपक्व तो हवाच बाठा
विचार कच्चे घेऊन येता
नाश पावतो इथेच बेटा !!
*
अढीत येता आपसुक येतो
अंतर्बाह्य रंग सनातन
आजूबाजूला सुगंध येई
समाधानी भावना आतून !!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






