श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ताठा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

इथे कोणी कुणाचाही खराअंदाज बांधेना

बळी ठरतोय शंकांचा तरी तो शांत बोलेना

*

सुखाचा शोध घेतांना हसाया लागली दुनिया

जरी बदनाम झाली ती तरीही सत्य सांगेना

*

मनाचा तोल ढळलेला कळाया लागले तेव्हा

फिरे मोकाट का वेडा कुणाला हात मागेना

*

पुढे जाणार होता तो गती घेवून जोमाने

तरी पायातल्या बेड्या मनाने तोच तोडेना

*

कसा हा वादळी वारा सुटाया लागला येथे

कुठे शोधून ही त्याला जरा आधार भेटेना

*

फसाया लागला तेंव्हा खचाया लागला होता

तरी ही गर्व झालेला कसा तो आज सोडेना

*

बळाचा येवढा ताठा कसा तो दावतो आहे

किती ओझे शिरी त्यांच्या तरी कमरेत मोडेना

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted