श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रचंड धग!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

नीट पेपरफुटीची धगच इतकी,

शिक्षण मंत्रालयाला लागली आग |

बेचिराख झाले आता सर्व पुरावे,

भाग रे बाबा.. अब तू भाग |

*

जिथे जिथे संशयाची सुई जाते,

तिथे तिथे आग कशी काय लागते |

भ्रष्ट व्यवस्थेवर प्रसन्न होऊन,

अग्निदेवता त्यांच्या नवसाला पावते |

*

फायर ब्रिगेड एनओसीसाठी,

नागरिकाना कडक नियम लावतात |

मंत्रालयाला मात्र आग लागते,

मोठी धेंडगं सहीसलामत वाचतात |

*

स्पर्धा परीक्षा शिक्षणाच्या बाजारात,

खासगी इंटीग्रेटेड क्लास झाले अड्डे |

बंद करा कॉलेज शाळा सर्व आता,

सरकारी अनुदानाला नकोयत खड्डे |

*

शिक्षण व्यवस्थेच्या आयचा घो,

तर केव्हाच तो झालाय |

पाल्यांच्या फिया भरून भरून,

मध्यमवर्गीय पुरता मेलाय |

*

राईट टू एज्यूकेशन,

आहे फक्त ते मिरवायाला |

वाईट केलीय सिच्यूवेशन,

सामान्यांची पुरती जिरवायला |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted