श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ यक्ष गान... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

(आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. कालिदास दिन! त्यानिमित्त मेघदूताचे स्मरण.)

मनोमंडलामधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले

विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग भोग आपले

मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु

कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरु

 *

सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया

आता इथे ग क्षणाक्षणाला तुझी आठवे माया

 *

जाणशील का ह्रदयामधल्या कोमल या भावना

विरह गीत हे गात येथ मी, येईल का तव श्रवणा

 *

भाग्यच माझे, म्हणून होते स्वप्नी तव दर्शन

धडपडते मन तशात द्याया, तुजला आलिंगन

 *

उत्सुक तुजला भेटाया पण, यावे सांग कसे

विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे

 *

क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन

तडफडते मन येथ जसे की जळावाचुनी मीन

 *

सुखद:खाचा खेळ असे हा कळते सारे जरी

विरह वेदना मनात सलते उरते ती अंतरी

 *

स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता

दुरावाच का आणिल अपुल्या प्रीतिला गाढता

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted