सुश्री नीशा डांगे
संक्षिप्त परिचय
जि. प. शिक्षिका/ साहित्यिका
प्रकाशीत साहित्य:- मुग्धायणी काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर:- दीर्घकथा संग्रह, लघुकथा संग्रह, बालकथा संग्रह
प्राप्त पुरस्कार:- पदमगंधा राज्यस्तरीय पुरस्कार, शब्द अंतरीचे कडून कोहिनूर पुरस्कार, मनस्पर्शी कडून साहित्य रत्न पुरस्कार, वीरशैव लिंगायत समाजाकडून 2 वेळा समाजभूषण पुरस्कार प्राप्त
☆ जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆
अलक लेखन क्रमांक 1
दूरदर्शनवर महाभारत पाहतांना मोहित म्हणाला
“आई तू का नाही ग यज्ञातून एकदम मोठी मुले काढलीस ?”
“का रे?” आई आश्र्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली
मोठा असतो ना तर शाळेतून घरी आल्यावर एकटे राहताना मला भीती वाटली नसती
अलक लेखन क्रमांक 2
प्रजासत्ताकदिनी सायंकाळी ध्वज उतरवून गुरुजी घरी गेल्याबरोबर मुलांनी कुंपण नसलेल्या शाळेत धुमाकूळ घातला. रंगीबेरंगी पताका तोडून मुलांनी त्याचे छोटे छोटे ध्वज बनविले आणि आपापल्या घरावर लावले. कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा……..
सुश्री निशा डांगे
पुसद
मो 84218754
सुस्वागतम् आणि अभिनंदन