सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रोमांच ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

वार्‍यावर उडणाऱ्या केसांना

सावरू नकोस

लाजेने चूर झालेल्या चेहर्‍याला

लपवू नकोस

तुझ्या धडधड  उडणाऱ्या काळजाला

तू बैचेन करू नकोस

आले ढग आकाशी दाटून

शोधू नकोस आडोसा

तुला लपण्यासाठी

स्वतःला भिजवून घे थेंबा-थेंबाने

पावसाचा रोमांच

ये ओलांडून उंबरठा मर्यादेचा

नाही येणार परतून

ते दिवस

अनुभवल्याशिवाय त्यांना

तू राहू नकोस..!!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments