श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 102 – रेडिओवर…! ☆
रेडिओवर….
सुख के सब साथी
दुःख मे नं कोई…..
हे गाणं लागलं ना की,
सारीच सुखं दुःखं
समोरासमोर येऊन उभी राहतात..
आणि भांडू लागतात
आपलं कोण आणि
परकं कोण..?
ह्या एकाच विषयावर..
रेडिओवर दुसरं…
गाणं सुरू होई पर्यंत..!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈