श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 93 – आक्रंदन पिडीतांचे ☆
गगनांतरी भिडाले
आक्रंदन पिडीतांचे।
झांजावाती निघाले
तांडव महापूराचे।
ओठाता स्तब्ध झाल्या
निःशब्द भावना या।
निजधाम सोडूनिया
कित्येक गेले विलया.
अशूंचे गोठ नयनी
आक्रंदतात कोणी।
शून्यात नेत्र दोन्ही
स्वप्नेच गेली विरूनी।
देईना साथ कोणी
थारा न देई धरणी।
जावे कुठे जीवांनी
घरट्याविना पिलांनी
भांबावल्या मनांना
समजावूनी कळेना।
सेल्फीत दंग मदती
जगण्याची प्रेरणा ना।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈