कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 116 – विजय साहित्य ?

होळी विशेष – तमोगुण  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

तत्वनिष्ठ संस्कारांनी

कटिबद्ध आहे होळी

अंतरीचे तमोगुण

बांधुयात त्यांची मोळी .. !! १ !!

 

तरू काष्ठ सुकलेले

त्याची समिधा तात्त्विक

रिती रिवाजांचा चर

तेज होळीचे सात्त्विक…!! २ !!

 

भक्त प्रल्हादाची कथा

भक्तीरुप अविष्कार

पानं पानं अहंकारी

होळीमध्ये स्वाहाकार..!! ३ !!

 

होळी पौर्णिमेच्या दिनी

करू दुर्गुण निःसंग

प्रासंगिक अभिव्यक्ती

सद्गुणांचा रागरंग…!! ४ !!

 

काम,क्रोध,लोभ,मोह

मद मत्सर भस्मात

फाल्गुनात वर्षाखेरी

चैतन्याची रूजवात… !! ५ !!

 

मार बोंब,घाल शिव्या

सर्व धर्म समभाव

नाना रंग स्वभावाचे

दाखविती रंक राव… !! ६ !!

 

ऋतूचक्र सांगतसे

आली आली बघ होळी

खरपूस समाचार

खाऊ पुरणाची पोळी…. !! ७ !!

 

नको हिरण्य रिपूचे

संसारीक आप्तपाश

अंतरंगी नारायण

करी तमोगुण नाश… !! ८ !!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments