सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “संसारातील क्रिकेट” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
संसाराच्या पिचवर रोजच चालते क्रिकेट
कितीही चांगले खेळा पण माझीच पडते विकेट
*
सासुबाई विकेटकीपर सासरे असतात अंपायर
झेल माझे झेलायला नवरा असतो तत्पर
*
टोमणे मारणारी नणंद नेमका मधला स्टंप उडवते
नवीन काहीच नाही तीच चमत्कार घडवते
*
नवरा ओरडतो पळ पळ पोरं म्हणतात मम्मी धाव
*
धावून धावून जमतात माझ्या खात्यात पाच रन
दिर बिचारा भावासारखा म्हणतो काय खेळलात वहिनी ए वन
*
ठाऊक असतं मला जमत नाही खेळायला
पण हौस वाटते ना मलाही बूट टोपी घालायला
*
किती मारले चौकार षटकार तरी झेल आमचेच जाणार
इथे तरी झेलतात आम्हाला तेवढेच समाधान घेणार
*
संसारातलं क्रिकेट नसत सोपं बरं
सासरची टीम नेहमीच जोरात आपलंच नसतं खरं
*
आऊट झालात म्हणलं की तंबूत जायचं ….एंडिंग
रिव्ह्यू नसतो इथे डिसिजन ऑलवेज पेंडिंग…….
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




