श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ स्थान महात्म्य… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
आई तुझिया
दारी आलो
अत्यानंदात
न्हालो न्हालो…
*
परब्रह्मांच्या चरणांनी
तयांच्या वास्तव्याने
पुनित ही भूमी
सद्गदीत मी आनंदाने..
*
गुरु एकचि दाता
मिळे सारे न मागता
लोळण घेतो तव रजा
खुंटे येणे-जाणे आता…
*
भले बुरे विसरुन
साधनरत मी तुला स्मरून
जे जे घडेल सारे
हितचि माझे असेल म्हणून…
*
श्वास निःश्वासी
तुझेच नाम आहे
नामचि मम नाव
पैलतीर मज नेत आहे..
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈





छान कविता