श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “भास आभास…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
यंत्रे आपुली दास की आपण त्यांचे दास.
काय खरे वा खोटे ही व्यक्ती की आभास.
*
आभासी दुनिये मध्ये रममाण जरी क्षणकाल.
विश्वास कुठे ठेवावा कितीतरी भेटले भास.
*
या यंत्रामधून पहातो अमर्याद आकाश.
पण हरवुन गेला कोठे मनातुनी विश्वास.
*
यंत्रात पाहतो दुनिया, रमतो मी तासंतास,
प्रत्यक्ष कुणी ना दिसती, ना ऐकू येती श्वास.
*
गप्पाष्टक येथे घडते, घडे चॅट संवाद,
तरीही होते मैत्री, तरी जागी होते आस.
*
हे सत्य असे की मिथ्या, आवाजांचेही भास.
आभासी दुनिये मध्ये, भासांचे ही आभास.
☆
© श्री सुनील देशपांडे
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





विचार करावा अशी कविता . कळते पण वळत नाही .