डॉ. सोनिया कस्तुरे
चित्रकाव्य
– “मौन…” –
☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
सोबत असे तरी, स्वप्नी येतेस तू
स्वप्नातही मौन का धरतेस तू?
*
असेल तुला बोलायचे मनातले
अबोला कधी कुठे सोडतेस तू?
*
अमाप व्यग्रता तुला कर्तव्यातले
गंध फुलांचा कसे एकवटतेस तू?
*
जबाबदारीची अगणित फुले काटे
उन्हाळे सक्षमतेने कसे पेलतेस तू?
*
अमाप रंग तुजपाशी फुलपाखरांचे
किती काटेरी झूल पांघरतेस तू !
*
विषय अनेक स्पर्श वाटती तोकडे
किती सांगोपांग जगणे रचतेस तू !
*
तृप्त जरी वाटे,ओठांवरील हसणे
विपत्तीत नभाशी, मैत्री करतेस तू
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





