प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ रिद्धीसिद्धीच गोंदणं… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
तळ्याच्या तळी साठले आभाळ
असा अनंताचा अनोखा मायाजाळ!
*
विजेची जळते रेघ आकाशात
प्रकाशतो जसा अज्ञाताचा हात!
*
उतरे धरेवरी लडीवाळ उन्हं
नको वाटे मग सावलीचं जीणं!
*
पौर्णिमेच्या पावलांनी अंगणात ये चांदणं
नव्या वाटा सजविते रिद्धीसिद्धीचं गोंदणं!
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





